India Legends vs Sri Lanka Legends : नुकतीच आशिया कप स्पर्धा पार पडली असून आता लवकरच आयसीसी टी20 विश्वचषक (T20 Cricket) देखील खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वी क्रिकेट जगतातील माजी दिग्गज क्रिकेटर सध्या मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भारताची लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सुरु असून दुसरीकडे रोड वर्ल्ड सेफ्टी सिरीज (Road Safety World Series) स्पर्धेचा दुसरा हंगामही पार पडत आहे. दरम्यान रोड वर्ल्ड सेफ्टी सिरीजचा अंतिम सामना आज पार पडणार आहे. यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखाली इंडिया लीजेंड्स (India Legends) श्रीलंका लीजेंड्सविरुद्ध (Sri Lanka Legends) मैदानात उतरणार आहे.
यंदाच्या हंगामात इंडिया लीजेंड्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यातील तीन सामने पावसामुळे अनिर्णित राहिले, असून इतर तीन सामन्यांमध्ये इंडिया लीजेंड्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा विचार करता सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंह, सुरेश रैना आणि युसूफ पठाणपर्यंत सर्वच खेळाडूंनी यंदा दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडून सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, चमिंडा वास अशा सर्वच दिग्गाजांकडून संघाला अपेक्षा असतील.
कधी, कुठे पाहाल सामना?
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा आजचा हा अंतिम सामना (1 ऑक्टोबर) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलीकास्ट सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 चॅनलवर पाहता येणार आहे. तसंच सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग Voot वर पाहता येईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
इंडिया लीजेंड्स
सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंह, मुनफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पंवार आणि राहुल शर्मा.
श्रीलंका लीजेंड्स
सनथ जयसूर्या, चमिंडा वास, तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), चमारा सिल्वा, कौशल्या वीरारत्ने, उपुल थरंगा, चिंतका जयसिंगे, दिलरुवान परेरा, जीवन मेंडिस, धम्मिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, महेला उदावत्ते, चमारा कपुगेदरा, दिलशान मुनवीरा, इसुरु उडाना, असाला गुणरत्ने