Viral Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. यानंतर दोन्ही संघात येत्या 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 5 ऑक्टोबरला आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं भारताचा सलामीवीर शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघाचं जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यापूर्वी भारताचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात वॉशिंग्टन सुंदर शिखर धवनच्या डोक्याची मालिश करताना दिसत आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत असून अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. 
 
शिखर धवननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तो सुंदरसोबत साउथ इंडियन भाषेत एकमेकांशी बोलताना दिसत आहे. तर, सुंदर त्याच्या डोक्याची मालिश करत आहे. धवननं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "दक्षिणमध्ये राहून तेथील भाषेत तर बोललंच पाहिजे.’ धवनचा हा फनी व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडलाय.  या व्हिडिओवरअनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनंही या व्हिडिओवर हसणारा इमोजी कमेंट केलाय.


व्हिडिओ-






 


भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार?
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंना 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बीसीसीआयनं या संदर्भात संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केलीय. भारतीय खेळाडू 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियात पोहोचले तर, त्यांना सरावासाठी अतिरिक्त आठवडा मिळेल. आगामी टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. यापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत. 


शिखर धवनकडं एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवण्याची शक्यता
एकदिवसीय मालिकेत शिखर धवनकंड भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शिखर धवननं भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं होतं. महत्वाचं म्हणजे, टी-20 विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा-