Ind Vs Ban Test Match: दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा (Ind vs Ban) 280 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य होते, परंतु बांगलादेशला 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विनचं तोंडभरून कौतुक केलं. 






रोहित शर्मा काय म्हणाला?


आम्ही खूप दिवसांनी खेळत होतो, पण तुमच्यात क्रिकेट नेहमीच असते. आम्ही सुमारे एक आठवड्यापूर्वी येथे आलो, आमच्या टीमला आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला. ऋषभ पंत अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर आला आहे. पण ज्या पद्धतीने त्याने स्वत:ला पुन्हा तयार केले ते कौतुकास्पद आहे, त्याला पाहणे हा एक उत्तम अनुभव आहे, असं रोहित शर्माने सांगितले. 


'ऋषभ पंतला आवडतो कसोटी फॉरमॅट...'


रोहित शर्माने ऋषभ पंतबद्दल बोलताना म्हणाला की, ऋषभ पंतने आयपीएलमधून पुनरागमन केले. यानंतर टी-20 विश्वचषकात त्याने शानदार खेळी केली. आता त्याने कसोटी फॉरमॅटमध्येही शतक ठोकले. ऋषभ पंतला कसोटी फॉरमॅट सर्वाधिक आवडतो. चेन्नईच्या कठीण विकेटवर त्याने चांगली फलंदाजी केली. त्याचे श्रेय त्याला जाते, त्याने येताच आपली छाप सोडली. गेल्या काही वर्षांत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो, यात शंका नाही. त्यामुळे आजच्या विजयाचे श्रेय आमच्या खेळाडूंना जाते, असं रोहित शर्मा म्हणाला. 






अश्विनला खेळापासून दूर ठेवू शकत नाही...


लाल मातीची विकेट गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त असते. पण जर तुम्ही फलंदाज असाल तर तुम्हाला संयम दाखवावा लागेल. या खेळपट्टीवर आमच्या खेळाडूंनी खूप संयम दाखवला. दबावात आमचे खेळाडू चांगले खेळले. विशेषत: रविचंद्रन अश्विनची फलंदाजी कौतुकास्पद आहे. गोलंदाजीशिवाय रवी अश्विनने फलंदाजीतही आम्हाला योगदान दिले आहे. हे त्याने याआधी देखील अनेकदा केले आहे. तुम्ही अश्विनला या खेळापासून दूर ठेवू शकत नाही, असं रोहित शर्माने सांगितले. 


संबंधित बातमी:


वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo