वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली.
आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.
भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत गडगडला.
बांगलादेशविरुद्धच्या या विजयानंतर सर्व खेळाडूंनी आनंद साजरा केला. रोहित शर्मा-विराट कोहली यांनी पहिले मिठी मारली.
अश्विन आणि जडेजाचं महत्वाचं योगदान राहिलं. त्यासोबतच पंत आणि गिलनेही मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे अश्विन, पंत आणि गिल सामना जिंकल्यानंतर एकमेकांना मिठी मारताना दिसले.
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
सामना संपल्यानंतर घरचं मैदान असलेल्या अश्विनचं कुटुंब मैदानात उतरलं होतं. यावेळी अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले.