Sri Lanka vs New Zealand: श्रीलंका आणि न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना 18 सप्टेंबर रोजी सुरू झाला. त्यानुसार चौथ्या दिवसाचा खेळ 21 सप्टेंबरला व्हायला हवा होता, मात्र तो विश्रांतीचा दिवस घोषित करण्यात आला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ श्रीलंका (Sri Lanka vs New Zealand) दौऱ्यावर असून, तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यातील तिसन्या दिवसअखेर यजमान श्रीलंकेने 202 धावांची आघाडी घेतली आहे. पण, काल चौथ्या दिवशी शनिवारी सामना खेळवला गेला नाही. ना हवामान खराब होते ना मैदान ओले होते, खरे तर असा कोणताही अडथळा नव्हता ज्यामुळे दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. मग चौथा दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला?, जाणून घ्या...
सहा दिवसांचा कसोटी सामना-
सदर विषयावर अधिकृत निवेदन जारी करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, चौथा दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करण्यात येत आहे. कारण श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून श्रीलंकेच्या संघातील खेळाडू आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदान करणार आहेत. या कारणामुळे जिथे 22 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस असणार होता, तिथे आता 23 सप्टेंबर हा या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस असणार आहे.
श्रीलंकेत निवडणूक-
2001 मध्ये शेवटच्या वेळी कोलंबो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने सहा दिवसांची कसोटी खेळली होती. तेव्हा पोया दिवस साजरा करण्यासाठी एक दिवस खेळ थांबवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी 2008 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात रेस्ट डे घोषित करण्यात आला होता. तेव्हाही निवडणुकीमुळे सहा दिवसांचा कसोटी सामना झाला.
सामन्याची सध्यस्थिती काय?
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम खेळताना 305 धावा केल्या होत्या. या डावात 114 धावांचे शतक झळकावून कामिंदू मेंडिस पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 340 धावांवर आटोपला. केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी अर्धशतके झळकावली. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 4 विकेट्स गमावून 237 धावा केल्या असून श्रीलंकेने 202 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या अँजेलो मॅथ्यूज (34 धावा) आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा हे देखील 34 धावांसह खेळत आहेत.
संबंधित बातमी:
मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक
Rishabh Pant: ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!