बंगळुरु : ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील वर्षाच्या भीषण अपघातानंतर सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे. सध्या बंगळुरुमधील एनसीएमध्ये रिहॅब करत आहे. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ज्यात तो पायऱ्या चढताना दिसत आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात अपघातानंतर तो पहिल्यांदा मैदानात उतरला आणि फलंदाजी करताना दिसला.


एका ट्विटर युझरने ऋषभ पंतचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो संपूर्ण तयारीनिधी मैदानात जाताना दिसत आहे. मैदानात पाऊल ठेवण्याआधी त्याने जमिनीला नमन केलं आणि मग कोणत्याही मदतीशिवाय स्वत: चालत क्रीजवर गेला. फलंदाजी करताना त्याने काही चेंडूंचा सामना केला. खेळताना तो अवघडलेल्या परिस्थितीत नक्कीच दिला. परंतु जे प्रेक्षक पंतला पाहत होते, त्यांनी शिट्ट्या वाजवून त्याचा उत्साह वाढवला.






पंत विश्वचषकासाठी फिट व्हावा यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील 


आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी ऋषभ पंतला तयार केलं जात आहे. त्याआधी तो फिट व्हावा यासाठी बीसीसीआयचे (BCCI) प्रयत्न सुरु आहेत. विश्वचषकला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियासह काही देशांनी विश्वचषक स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. परंतु भारताने अद्याप आपल्या संघाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दरम्यान ऋषभ पंतच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली आहे, याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. परंतु ऋषभ पंतला पुन्हा एकदा मैदानात पाहून प्रेक्षक त्याच्या कमबॅक प्रतीक्षा करत आहेत. 


कार अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत


मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातात त्याला खूप गंभीर दुखापत झाली होती, ज्यावर बराच काळ उपचार करण्यात आले. त्याच्या गुडघ्याचा लिगामेंट खराब झाल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत बंगळुरु इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब करत आहे.


चाहत्यांना ऋषभ पंतच्या कमबॅकचा विश्वास


क्रिकेट विश्वचषक अगदी तोंडावर आला आहे. संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असावा अशी भारतीय चाहत्यांची आणि भारतीय क्षेत्राची इच्छा आहे. पण त्याला ज्या प्रकारची दुखापत झाली, त्यामुळे वर्ल्ड कपपर्यंत तंदुरुस्त होणं त्याच्यासाठी कठीण आहे. ऋषभने सराव सुरु केला असला तरी. मात्र अद्याप बीसीसीआय किंवा बीसीसीआयच्या अन्य कोणत्याही अधिकाऱ्याने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण तरीही 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.


हेही वाचा


Rishabh Pant : जिगरबाज पंत! स्टिकशिवाय चालू लागला ऋषभ पंत, पाहा व्हिडीओ