T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सध्या या स्पर्धेच्या वॉर्म-अप सामन्यातील क्लालिफायर सामने खेळले  जातायेत. यानंतर पुढच्या आठवड्यापासून सुपर-12 फेरीला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळेल. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय. संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) पायाला दुखापत झाल्याचं सांगितलंय जातंय. ज्याचा फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत त्याच्या पायाला बँडेज बांधलेल्या अवस्थेत दिसला. या फोटोंवरून पंतच्या पायाला दुखापत झाल्याची पाहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात त्याला विश्रांती दिल्यानं ऋषभच्या दुखापतीच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत देण्यात आली नाही. 


ट्वीट-






 


पाकिस्तानविरुद्ध सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल का?
भारतानं यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी पंत आणि कार्तिक या दोन यष्टीरक्षक फलंदाजांचा आपल्या संघात समावेश केलाय. मात्र, आता रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंत आणि कार्तिक यांच्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश होतो? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात कार्तिकनं 14 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला.


टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.


हे देखील वाचा-