T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत अगदी रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी सुरु पात्रता सामन्यातही कमालीची चुरस सुरु असून पहिल्या दिवशीप्रमाणे आजही एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडीज (SCO vs WI) सामन्यात वेस्ट इंडीजसारख्या अनुभवी संघाला स्कॉटलंडनं तब्बल 42 धावांनी पराभूत केलं आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर आजचा स्कॉटलंडचा विजयही आश्चर्यकारक आहे. आधी बॅटिंग करत स्कॉटलंडनं वेस्ट इंडीजला विजयासाठी 161 धावांचं लक्ष्य दिले. ज्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ 118 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ 43 धावांनी सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंड संघाची सुरुवात दमदार झाली. दोन्ही सलामीवीर चांगली फलंदाजी करत होते. जियॉर्ज मुन्सेने अखेरपर्यंत क्रिजवर राहत 53 चेंडूत 66 धावा ठोकल्या. त्याच्याशिवाय मायकल जोन्स आणि मॅकलॉयड यांनी अनुक्रमे 20 आणि 23 धावा केल्या. ज्यामुळे स्कॉटलंडने 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 161 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजच्या एकाही फलंदाजाला खास कामिगरी करता आली नाही. स्टार ऑलराऊंडर जेसन होल्डरने केवळ 33 चेंडूत 38 धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर तो देखील बाद झाला. वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ 18.3 ओव्हरमध्ये 118 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे स्कॉटलंडने सामना 42 धावांनी जिंकला. स्कॉटलंडकडून सामन्यात 66 धावा करणाऱ्या मुन्सेयाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.




हे देखील वाचा-


Mohammed Shami : प्लेईंग 11 चा भाग नसतानाही अखेरच्या षटकात बोलावलं, अन् 4 विकेट्स घेत शामीनं मैदान गाजवलं