T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झालीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.


भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-


- नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या केएल राहुल  (57 धावा) आणि रोहित शर्मा (15 धावा) या सलामीच्या जोडीनं भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकात भारतानं एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या. 


- यादरम्यान राहुलनं अवघ्या 27  चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर, रोहितच्या बॅटीतून काही खास शॉट्स पाहायला मिळाले. या सामन्यातील पावरप्लेमध्ये भारताचं पारडं जड दिसलं. मात्र, पुढच्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पुनरागमन केलं. 


- ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टन अगर यांनी अनुक्रमे केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना बाद करून भारताला दोन धक्के दिले. भारतानं 10 षटकात दोन विकेट्स गमावून 89 धावा केल्या. 


- पुढच्या पाच षटकात भारतानं 49 धावा लुटल्या. परंतु, विराट कोहली (19 धावा) आणि हार्दिक पांड्याची (2 धावा) विकेट्स गमावली. अखेरच्या पाच षटकात भारतानं 48 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. 


- यादरम्यान सूर्यकुमार यादवनं 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेश स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टर अगरच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.


- भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं मिचेल मार्शच्या रुपात ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिला धक्का दिला.


- या सामन्यात मिचेल मार्शनं 35 धावा केल्या. त्यानंतर युजवेंद्र चहलनं स्मिथला क्लीन बोल्ड करून भारताला दुसरं यश मिळवून दिलं. त्यांनंतर ग्लेन मॅक्सवेलही 23 धावा करून माघारी परतला.


- मार्कस स्टॉयनिसही 29 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार आरोन फिंचनं एकाकी झुंज दिली. त्यानं या सामन्यात 79 धावांची खेळी केली. आरोन फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का लागला. 


- दिर्घकाळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शामीनं ऑस्ट्रेलिया फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. 


- ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या षटकात 11 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या दोन चेंडूत दो धावा दिल्यानंतर मोहम्मद शामीच्या अखेरच्या चार चेंडूत ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले.


हे देखील वाचा-