T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचं (India vs Australia) कंबरडं मोडलं. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा स्टेडियमवर (Gabba) आज खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी विजय केला. भारताच्या विजयात मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) महत्वाची भूमिका बजावलीय. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला 11 धावांची गरज असताना मोहम्मद शामीनं अवघ्या चार धावा खर्च करून ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यात एका रनआऊटचा समावेश आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc) बाऊन्सर थेट भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हेल्मेटवर जाऊन आदळला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
भारताच्या डावातील 19 व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील पाचवा चेंडू सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. स्टार्कच्या बाऊन्सरमुळं सुर्यकुमारचं हेल्मटही तुटलं. ज्यानंतर मैदानात शांतता पसरली. सूर्यकुमार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताच्या अनेक विजयात त्यानं महत्वाची भूमिका बजावली आहे. टी-20 विश्वचषकातही सूर्यकुमारच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. यामुळं सूर्यकुमारला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, अशी भारतीय संघासह संपूर्ण भारतीय चाहत्यांची इच्छा असेल.
व्हिडिओ-
सूर्यकुमारचं अर्धशतकब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या सराव सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमारचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं 151 च्या स्ट्राईक रेटनं 33 चेंडूत 50 धावांची खेळी केली. ज्यात एक षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजयटी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झालीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्याकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.
हे देखील वाचा-