Ind vs Aus 1st Test : बाप तो बाप होता है! ऋषभने असा फटका मारला, की सगळे बघतच राहिले; व्हिडीओ पाहून सगळेच अवाक!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली असून सर्वांच्या नजरा विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंवर लागल्या असतानाच ऋषभ पंतची क्रेझही कमी नाही.
Rishabh Pant Ind vs Aus 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली असून सर्वांच्या नजरा विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंवर लागल्या असतानाच ऋषभ पंतची क्रेझही कमी नाही. खासकरून गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याच्या संस्मरणीय खेळीने टीम इंडियाला मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ऋषभ पंतने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना रोमांचित केले. त्याने भलेही 78 चेंडूत 37 धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्याच्या शैली अनोखीच होती. या काळात ऋषभ पंतने 47.44 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतच्या एका शॉटने ऑस्ट्रेलियन समालोचकही हैराण झाले होते.
ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या दिवशी टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाने दिवसाच्या पहिल्या सत्रात 4 विकेट गमावल्या होत्या आणि अशा स्थितीत ऋषभ पंतला लवकर क्रीजवर यावे लागले. आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेकवेळा कठीण परिस्थितीतून टीम इंडियाला बाहेर काढणाऱ्या पंतवर पुन्हा एकदा अशीच जबाबदारी आली आणि त्यात तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला. दुसऱ्या सत्रात नितीशकुमार रेड्डीसोबतही त्याने चांगली भागीदारी केली.
As only Rishabh Pant can do! 6️⃣#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/vupPuWA8GG
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
पंतने ठोकला आश्चर्यकारक षटकार
पंत मैदानात असताना अनेक मोठे फटके पाहायला मिळणार हे निश्चित. पण मोठे फटके खेळण्याची पंतची पद्धतही इतर फलंदाजांपेक्षा वेगळी आहे, जी त्याने वेगवान गोलंदाजांवर रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्कूपसारखे फटके खेळून अनेकदा दाखवली आहे. त्याने इथेही असेच काही केले आणि थेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम गोलंदाज कमिन्सवर निशाणा साधला. 42 व्या षटकात कमिन्सच्या शेवटच्या चेंडूवर पंतने ऑफ स्टंपच्या बाहेर एक स्कूप शॉट खेळला आणि हा शॉट खेळत असताना तो खेळपट्टीवर पडला.
इकडे तो खेळपट्टीवर पडला आणि तिथे चेंडू डीप फाइन लेग बाऊंड्रीबाहेर गेला. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ आणि प्रेक्षक आश्चर्यचकित होऊन हा शॉट पाहत राहिले आणि पंत आणि कमिन्स यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक होता.
हे ही वाचा -