Rinku Singh Century : 11 चौकार अन् षटकार... रिंकू सिंगची रणजी ट्रॉफीत तुफान खेळी, दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, धमाकेदार शतक; आता ऑस्ट्रेलियाला सुट्टी नाही
Andhra vs Uttar Pradesh Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीच्या मैदानात रिंकू सिंगने धुमाकूळ घातला आहे. 2025-26 हंगामातील पहिल्याच सामन्यात आंध्रविरुद्ध त्याने वादळी खेळी करत दमदार शतक झळकावले.

Rinku Singh Century Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीच्या मैदानात रिंकू सिंगने धुमाकूळ घातला आहे. 2025-26 हंगामातील पहिल्याच सामन्यात आंध्रविरुद्ध (Uttar Pradesh vs Andhra) त्याने वादळी खेळी करत दमदार शतक झळकावले. आंध्रने पहिल्या डावात 470 धावांचा डोंगर उभा केला होता, त्याच्या प्रत्युत्तर उत्तर प्रदेश (UP) संघाची सुरुवात खराब झाली. अशा वेळी मैदानात रिंकू सिंग आला आणि विपराज निगमसोबत शतकी भागीदारी करत यूपीला पुन्हा सामन्यात परत आणले.
रिंकू सिंगचे फर्स्ट क्लास कारकिर्दीतील आठवे शतक (Rinku Singh Century Ranji Trophy 2025 News)
कर्णधार करण शर्मा बाद झाल्यानंतर रिंकू मैदानात उतरला. त्यावेळी यूपीचा स्कोअर होता 146/3. त्यानंतर सलग दोन विकेट् पडल्या, आर्यन जुयाल (66) आणि भारताच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार प्रियम गर्ग (18) पवेलियनमध्ये परतले. 178 धावांवर यूपीची अर्धी टीम माघारी गेली होती. अशा परिस्थितीत रिंकूने अराध्य यादवसोबत भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. अराध्य 17 धावा करून बाद झाला, पण रिंकूला मग आयपीएल स्टार विपराज निगमची चांगली साथ मिळाली.
दोघांनी तिसऱ्या दिवसाच्या (शुक्रवार) अखेरीस 6 बाद 294 असा संघाचा स्कोअर उभा केला. त्यावेळी यूपी अजूनही आंध्रच्या पहिल्या डावापेक्षा 176 धावा मागे होती. रिंकू 82 धावांवर नाबाद होता, तर विपराज 28 धावांवर खेळत होता. आज (शनिवार) रिंकूने आपला खेळ पुढे नेत फर्स्ट क्लास कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने 180 चेंडू खेळले आणि त्याच्या बॅटमधून 9 चौकार व 2 षटकार झळकले.
यूपीला मिळेल का आघाडी?
कानपूरमध्ये सुरू असलेल्या या सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. बातमी लिहिताना यूपीचा स्कोअर 7 बाद 359 असा होता आणि संघ अजूनही 111 धावांनी मागे होता. विपराज 42 धावा करून बाद झाला. सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असली तरी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवणे यूपीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. रिंकू सध्या 118 धावांवर खेळत आहे आणि त्याच्या सोबत क्रीजवर शिवम शर्मा आहेत.
🚨 HUNDRED FOR RINKU SINGH IN RANJI TROPHY 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) October 18, 2025
- Uttar Pradesh lost 2 quick wickets then came Rinku Singh and scored a terrific Hundred against Andhra and putting a real fight to get the first Innings lead. pic.twitter.com/Nf60scF4Om
रिंकू सिंग पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडला गेला आहे. या दौऱ्यापूर्वीच तो रणजी ट्रॉफी 2025-26 च्या पहिल्या फेरीत खेळत आहे. रिंकूसाठी हा दौरा अत्यंत खास असणार आहे, कारण त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आतापर्यंत 5 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 4 डावांत 52.50 च्या सरासरीने 105 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 175.00 इतका आहे.
हे ही वाचा -




















