Video : बॉलचा भन्नाट वेग अन् एका दणक्यात स्टंप उभा चिरला! बॅट्समनला काही कळायच्या आधीच सगळं संपलं, प्रेक्षक झाले अवाक
Riley Meredith Stump Split In Half In T20 Blast 2025 : क्रिकेट सामन्यात चाहत्यांना अनेकदा अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळतात.

Riley Meredith Stump Split In Half In T20 Blast 2025 : क्रिकेट सामन्यात चाहत्यांना अनेकदा अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळतात. काही खेळाडू त्यांच्या फलंदाजीने, तर काही त्यांच्या गोलंदाजीने आणि काही त्यांच्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना प्रभावित करतात. पण इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या व्हिटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेत असे काही दिसले, जे कदाचित कोणी आधी कल्पनाही केली नसेल. या सामन्यात गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथने एका दणक्यात स्टंप उभा चिरला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बॉलचा भन्नाट वेग अन् एका दणक्यात स्टंप उभा चिरला!
8 जुलै रोजी व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये सोमरसेट आणि एसेक्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात सोमरसेटकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथने त्याच्या गोलंदाजीदरम्यान स्टंप उभा चिरला. त्याने सामन्यात त्याची पहिली विकेट घेताना हे केले. मेरेडिथने एसेक्सचा सलामीवीर मायकेल पेपरची विकेट घेतली.
मेरेडिथने पहिल्यांदा मायकेलला गोलंदाजी केली आणि त्यानंतरच्या दृश्याने सर्वांनाच धक्का दिला. जे घडले ते कदाचित यापूर्वी कोणत्याही क्रिकेट सामन्यात पाहिले नसेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, स्टंप चेंडू लागल्यानंतर स्टंप मधून उभा चिरला आणि दोन लांब तुकडे झाले. याआधीही अनेक गोलंदाजांनी गोलंदाजी करताना स्टंप तुटले आहेत, परंतु हे दृश्य त्या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या सॉमरसेटच्या संघाने 20 षटकांत 6 गडी बाद 225 धावा केल्या. टॉम कोहलर संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज होता, त्याने 39 चेंडूंत 90 धावांची तुफानी खेळी खेळली. एसेक्ससमोर 226 धावांचे मोठे लक्ष्य होते. एसेक्सचा संघ फक्त 130 धावा काढल्यानंतर ऑलआऊट झाला. सॉमरसेटकडून मॅट हेन्रीने 4 षटकांत 21 धावा देत 4 बळी घेतले. रिले मेरेडिथने सामन्यात 2 षटकांत 22 धावा देत 2 विकेट घेतले.
हे ही वाचा -




















