India vs Bangladesh 2nd Test Playing XI : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने सहज विजय मिळवला होता. आता भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे, जिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 2012 मध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने मायदेशात चमकदार कामगिरी केली आहे आणि हीच गती कानपूरमध्येही कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.


संथ खेळपट्ट्यांवर बांगलादेशचे फिरकी गोलंदाज शकिब अल हसन, मेहदी हसन मिराज आणि तैजुल इस्लाम भारतीय फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना त्यांच्या रणनीतीत काही बदल करावे लागतील. त्यामुळे खेळपट्टीचा विचार करता भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहेत.


कुलदीपला मिळणार संधी


रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे संघाचे दोन प्रमुख फिरकीपटू आहेत आणि त्यांची जागा निश्चित मानली जाते. मात्र तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलपेक्षा कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाऊ शकते. कुलदीपची डावखुरी मनगटाची फिरकी आणि बांगलादेशविरुद्धची त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.


सिराजला मिळणार ब्रेक


वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. आकाश दीपने चेन्नई कसोटीत चांगली कामगिरी केली. आकाशचा वेग आणि अचूकतेने निवडकर्त्यांना प्रभावित केले असून त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. 


टॉप ऑर्डर होणार नाही बदल...


भारतीय संघाच्या फलंदाजीच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांनी पहिल्या कसोटीत अर्धशतके झळकावली. तर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल अपेक्षेप्रमाणे खेळले नाहीत, पण त्याचे संघातील स्थान निश्चित आहे.


बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.


हे ही वाचा -


ICC Test Batman Ranking : क्रमवारीत पंतचा डंका! रोहितला मोठा धक्का तर विराट कोहली टॉप-10मधून बाहेर


Drona Desai Record : 7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावांची मॅरेथॉन इनिंग; 18 वर्षीय पठ्ठ्याचा धमाका, 'रेकॉर्ड बुक'मध्ये नोंद


Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?


Ind vs Ban: टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष