Cricket Shoes Price : भारतात क्रिकेट (Indian Cricket) खेळणे कोणाला आवडत नाही. लहानपणापासून अनेकांना क्रिकेटमध्ये अलौकिक कामगिरी करण्याची इच्छा असते. सध्या क्रिकेटमध्ये अनेक बदल होत आहेत, नव्या टेक्नोलॉजी येत आहेत. सध्या क्रिकेटमध्ये आलेल्या बॅट पूर्वीपेक्षा अतिशय चांगल्या आहेत. फलंदाजांकडे स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक गार्ड्स आले आहेत. पूर्वीच्या काळी अनेक सुविधा उपलब्ध नसताना क्रिकेट खेळले जायचे. विशेषत: शूजबाबत बोलायचे झाले तर सध्या गोलंदाजांसाठी मार्केटमध्ये चांगले शूज उपलब्ध झाले आहेत. आताचे शूजमध्ये स्पाइक्स लावण्यात आलेले असतात. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांना रन-अप घेणे सोपे जाते. क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शूजची किंमत किती असते? त्यांची सध्या किंमत किती आहे?


क्रिकेटमधील शूजची किंमत किती? 


एसजी (SG) हे भारतातील स्पोर्ट संबंधित शूज बनवणारी कंपनी मानली जाते. भारतात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये बहुसंख्य वेळा याच कंपनीचे लेदर बॉलचा वापर केला जातो. शूज विषयी बोलायचे झाले तर एसजीच्या ऑफिशियस वेबसाईटवर स्पाईक्स असणाऱ्या शूजची किंमत 2 हजार पासून 3 हजार रुपयांपर्यंत आहे. शूजची क्वालीटी विचारता घेतली तर किंमत वाढूही शकते. याशिवाय अदिदास आणि पुमा सारख्या कंपन्यांचे शूज महाग मानले जातात. अदिदास आणि पुमाचे स्पाइक्स असणारे क्रिकेट शूज 10 ते 20 हजार रुपयांना विकले जातात. 


विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? 


विराट कोहली सध्याचा घडीचा सर्वात लोकप्रिय, सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. तो स्वत: वैयक्तिक स्तरावर ब्रँड बनला असल्याचे त्याचे चाहते म्हणत असतात. शिवाय विराट कोहलीची संपत्ती एक हजार कोटींच्या वर पोहोचली आहे. विराट कोहली पुमा या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. ही कंपनीच त्याचे शूज बनवते. भारताची स्पोर्ट्स कंपनी डीएससीने दिलेले माहितीनुसार, विराटच्या शूजची किंमत 20 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. 


क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी स्पाइक असणारे शूज वापरावेत, असं काही नाही. मात्र, स्पाइक असणारे शूज वापरले तर खेळाडूंना चांगले ग्रीप मिळते. स्पाइक असणारे शूज वापरले तर खेळपट्टीवर धावताना घसरत नाहीत. साधारण शूजमध्येही स्पाइक बसवले जाऊ शकतात. 


इतर महत्वाच्या बातम्या


Manoj Jarange VIDEO : मनोज जरांगे नवव्या दिवशी 'थांबले', उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा


Kangana Ranaut : "मी माझे शब्द मागे घेते", भाजपने फटकारल्यानंतर कंगनानं मागितली माफी; कृषी कायद्यांसंदर्भातील वक्तव्य घेतलं मागे