Warning To Ravindra Jadeja: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2024  येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेला आयपीएल संपल्यानंतर सुरुवात होणार आहे. भारताचं (Team India) वर्ल्डकपचं अभियान 5 जूनपासून सुरु होणार आहे. आयसीसीनं स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 1 मे पर्यंत 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. टी-20  वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (Team India Announcement) घोषणा होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. भारतीय संघ जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) इशारा मिळाला आहे. वर्ल्ड कप अगोदरच रवींद्र जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. जडेजा सातव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी समाधानकारक पर्याय नसल्याचं दिग्गज खेळाडूनं म्हटलं आहे.  


यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा चांगली कामगिरी करु शकलेला नाही. जडेजाचा हाच खराब फॉर्म त्याला टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर टॉम मूडी आयपीएलमधील जडेजाच्या कामगिरीवर नाखूश आहेत.  


स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना टॉम मूडी यांनी "मी जडेजाला संघात अशा कारणासाठी घेईन कारण त्यांच्यामध्ये बेस्ट लेफ्ट ऑर्म स्पिन बॉलरचा पर्याय पाहत आहे.देशातील सर्वात चांगला बेस्ट लेफ्ट ऑर्म स्पिनर बॉलर आहे. माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो सातव्या स्थानावर बॅटिंग करणार नाही. मला वाटत नाही की तो टी-20  वर्ल्डकपमध्ये सातव्या स्थानावर बॅटिंग करण्यासाठी योग्य आहे. त्याच्या स्ट्राईक रेटवरुन हे स्पष्ट होतं, असं टॉम मूडी म्हणाले.   


टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण देखील या चर्चेत सहभागी होता. इरफाननं देखील टॉम मूडी यांच्या दाव्याला दुजोरा दिला. इरफान पठाणनं देखील जडेजा सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी योग्य नसल्याचं म्हटलं. रोहित शर्मानं सातव्या स्थानावर रवींद्र जडेजाच्याऐवजी टीम इंडियाकडून एखाद्या चांगल्या फिनिशरला संधी द्यावी, असं पठाण म्हणाला.  


यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जडेजाची कामगिरी कशी?


चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल खेळणाऱ्या रवींद्र जडेजानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 9 मॅचमध्ये फलंदाजी करताना 131.93 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. या 9 मॅचेसमध्ये रवींद्र जडेजानं 157 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजानं 46.80 च्या सरासरीनं धावा देत 5 विकेट घेतल्या आहेत.  


संबंधित बातम्या : 



Shah Rukh Khan : केकेआरच्या कोणत्या खेळाडूला वर्ल्ड कपचं तिकीट मिळावं, शाहरुख खाननं सांगितली मन की बात...