Rohit Sharma Net Worth :रोहित शर्माची कमाई कोटींमध्ये, हिटमॅनची नेटवर्थ नेमकी किती? मुंबई इंडियन्सकडून किती पैसे मिळतात?
रोहित शर्माची नेटवर्थ जवळपास 214 कोटी रुपये आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मिळणारी सॅलरी, मॅच फीस, आयपीएल आणि जाहिरातीतून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा बीसीसीआयच्या कराराच्या अ श्रेणीत आहे. बीसीसीआय अ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये देते.
रोहित शर्माला एका टेस्ट मॅचसाठी 15 लाख रुपये मिळतात. तर, एका वनडेसाठी 6 लाख, टी-20 मॅचसाी 3 लाख रुपये रोहितला मिळतात.
आयपीएलमध्ये रोहित शर्माचं मुंबई इंडियन्स सोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला वार्षिक 16 कोटी रुपये देते. याशिवाय रोहित शर्मानं आयपीएलमधून आतापर्यंत 178 कोटी रुपये कमावले आहेत.
रोहित शर्माला मोठ्या ब्रँडसच्या जाहिराती देखील करतो. याशिवाय रोहित शर्मा क्रिकेट अकादमी चालवतो. रोहित शर्मा अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.