Ind vs Aus Test 3rd : सिराजच्या 'त्या' कृत्यावर जडेजाचा संताप! 30 यार्ड सर्कलमध्ये नक्की काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे.

Australia vs India, 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे. ज्यामध्ये दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने बॅकफूटवर ढकलले. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला, पण दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांच्या शतकीय खेळीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन वरचढ असल्याचे दिसले.
Australia on top at the end of Day 2.#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/Nh59FEIf0u pic.twitter.com/RGDzi6Jt2c
— ICC (@ICC) December 15, 2024
ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतीय संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला आहे. त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि दुसऱ्या दिवशी जबरदस्त 152 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. जसप्रीत बुमराह वगळता बाकीचे गोलंदाज पुन्हा फेल ठरले, परंतु असे असतानाही भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांशी मैदानात भिडताना दिसले. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वातावरण चांगले तापले होते. पण यादरम्यान भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्यात एक घटनाही पाहायला मिळाली, जी कदाचित भारतीय चाहत्यांना फारशी आवडणार नाही. आता त्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Travis Head and Steve Smith scored 💯s as Australia reigned supreme on Day 2 despite Jasprit Bumrah’s second 5️⃣-fer in the #AUSvIND series.#WTC25 https://t.co/wUe51X2VvS
— ICC (@ICC) December 15, 2024
खंरतर झाले असे की, रवींद्र जडेजा सिराजच्या थ्रोमुळे खूप संतापला होता. ही घटना 63व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. रवींद्र जडेजाने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जो हेडने पॉइंटकडे खेळला आणि एकेरी धाव घेतली. सिराजने पटकन चेंडू घेतला आणि जोरात गोलंदाजाच्या टोकाकडे फेकला. मात्र, हेड आरामात दुसऱ्या टोकाला पोहोचला होता, हा थ्रो करायची काही जात गरज नव्हती. जडेजाने कसा तरी हा वेगवान थ्रो रोखण्यात यश मिळवले, पण त्या थ्रोमुळे तो संतापला होता, कारण जडेजाच्या हाताला तो जोरात लागला. त्यानंतर सिराजला हातवारे करून स्पष्ट केले की त्याची गरज नव्हती. सिराजने रवींद्र जडेजाची माफीही मागितली.
— The Game Changer (@TheGame_26) December 15, 2024
हे ही वाचा -





















