नवी दिल्ली : भारताचा आघाडीची फिरकीपटू आर अश्विन यानं निवृत्ती जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु असतानाच आर. अश्विनं निवृत्ती जाहीर केली. यामुळं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आर. अश्विन दुसऱ्या दिवशी भारतात दाखल झाला. आता आर. अश्विननं सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यानं सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्या सारख्या दिग्गजांचं नाव घेत स्क्रीन शॉट पोस्ट करत एक मजेशीर कॅप्शन शेअर केलं आहे.
अश्विन काय म्हणाला?
रविचंद्रन अश्विननं कॅप्शनमध्ये म्हटलंय की जर 25 वर्षांपूर्वी जर कोणी म्टलं असतं की माझ्याकडे स्मार्टफोन असेल आणि माझा कॉल लॉग असा दिसेल तर मला हार्ट अटॅक आला असता. यानंतर रविचंद्रन अश्विननं सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचे आभार मानले आहेत. रविचंद्रन अश्विनची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
भारतानं 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघात सचिन तेंडुलकर आणि रविचंद्रन अश्विन देखील होता. रविचंद्रन अश्विन भारतीय कसोटी संघात सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणारा दुसरा खेळाडू आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विननं 106 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 537 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन सातव्या स्थानावर आहे. भारतात कसोटीत सर्वाधिक विकेट अनिल कुंबळेच्या नावावर आहेत.
आर. अश्विन मालिका सुरु असताना निवृत्त
बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या या मालिकेत भारतानं पर्थमधील कसोटी जिंकली. तर, ऑस्ट्रेलियानं अॅडिलेडमधील दुसरी कसोटी जिंकली. ब्रिस्बेन येथील तिसरी कसोटी पावसामुळं अनिर्णित राहिली. या कसोटीनंतर आर अश्विन यानं निवृत्ती जाहीर केली. आर. अश्विननं महेंद्रसिंह धोनी, अनिल कुंबळे यांच्या प्रमाणं ऑस्ट्रेलियात निवृत्ती जाहीर केली. आर. अश्विन भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य आहे.
अश्विनच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघात ऑफ स्पिनर म्हणून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
INDW vs WIW : भारतीय महिला संघांचा तब्बल 5 वर्षांनी घरच्या मैदानावर टी 20 मालिकेत विजय