मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तीन सामने पार पडले आहेत. भारतानं एक कसोटी पर्थ कसोटी जिंकली आहे. तर, अॅडिलेडमधील दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियानं जिंकली. ब्रिस्बेनमधील गाबा येथील कसोटी पावसामुळं ड्रॉ झाली. त्यामुळं चौथी कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. भारतीय संघाला चौथ्या कसोटीमध्ये फलंदाजी करताना नवी रणनीती राबवावी लागू शकते. चौथी कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. ती कसोटी भारतासाठी महत्त्वाची आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानं फलंदाजी क्रमात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल दोघेही खराब फॉर्मसोबत संघर्ष करत आहेत. दोघांना देखील मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आकाश चोप्रानं एक सल्ला दिला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं तो म्हणाला आहे. रोहित शर्मानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं तर शुभमन गिलला मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर यावं असा सल्ला आकाश चोप्रानं दिला आहे.
आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं की रोहित शर्माला आवश्यक असल्यास त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा विचार करता येईल. शुभमन गिलनं मधल्या फळीत किंवा खालच्या क्रमांकावर खेळलं पाहिजे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलला संघाबाहेर काढण्याचा प्रश्न नाही. रोहित शर्माला संघाबाहेर काढण्याची कोणी चर्चा देखील करु शकत नाही, असं आकाश चोप्रा म्हणाला.
शुभमन गिलकडून सातत्यानं खराब कामगिरी केली जातेय. शुभमन गिलनं आशियाबाहेर गेल्या 16 डावात केवळ एकदा 40 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.आता त्याला धावा कराव्या लागतील आणि स्थिती बदलेलं, असं आकाश चोप्रा म्हणाले.
दरम्यान भारतानं एक कसोटी जिंकल्यास बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहू शकते. कारण, यापूर्वीच्या मालिकेत भारतानं विजय मिळवल्यानं मालिका ड्रॉ झाल्यास बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताकडे राहू शकते.
कसोटी दौऱ्यावरील भारतीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), अभिमन्यु ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, सरफराज खान, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर, जसपीरित बुमराह, आकाश दीप, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
इतर बातम्या :