INDW vs WIW : भारत विरुद्ध वेस्टइंडिजच्या महिला संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या टी 20 मालिकेत भारताने 2-1 दणदणीत विजय मिळवलाय. भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 60 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली.. स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला.
या सामन्यात कर्णधार स्मृती मंदानाने 47 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 77 धावा केल्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने 21 चेंडूंत 3 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, वेस्टइंडिजचा हा निर्णय टीम इंडियासाठी महत्त्वपूर्व ठरलाय. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 217/4 धावा केल्या. संघासाठी कर्णधार स्मृती मंदाना हिने सर्वात मोठी खेळी खेळली. ऋचा घोषनेही निर्णाय खेळी करत 257.14 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
218 धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजच्या संघाने गुढगे टेकले
टीम इंडियाने दिलेल्या 218 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला. संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 20 धावांच्या स्कोअरवर कियाना जोसेफच्या रूपाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर संघाला दुसरा धक्का 57 धावांवर आणि तिसरा धक्का 62 धावांच्या स्कोअरवर बसला. त्यानंतर संघाने 100 धावांपूर्वी चौथी विकेटही गमावली. संघाला चौथा धक्का 12व्या षटकात 96 धावांवर बसला. यानंतर वेस्ट इंडिजने 15 व्या षटकात 129 धावांवर पाचवी विकेट गमावली. येथून वेस्ट इंडिजने झटपट विकेट गमावल्या. संघाची सहावी विकेट 136 धावांवर, सातवी विकेट 137 धावांवर, आठवी विकेट 142 धावांवर आणि नववी विकेट 147 धावांवर पडली. संघ 20 षटकात 157/9 धावांवर सर्वबाद झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या