ICC Test Rankings : हैदराबाद कसोटी सामन्यात भारताला इंग्लंडकडून 28 धावांनी पराभाचा सामना करावा लागला. या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन यानं शानदार गोलंदाजी केली होती. हैदराबाद कसोटी अश्विनने इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. या शानदार गोलंदाजीचं अश्विनला बक्षीस मिळालं आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अश्विनने प्रथम स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराहलाही गोलंदाजी क्रमवारीत फायदा झालाय. जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. फलंदाजीमध्ये विराट कोहली टॉप 10 फलंदाजात आहे. आयसीसीच्या टॉप 10 फलंदाजामध्ये असणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
जाडेजा आघाडीवर -
गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे तर जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजा दहाव्या स्थानावर आहे. टॉप 10 गोलंदाजामध्ये भारताचे तीन गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर विराजमान आहे तर आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. इंग्लंडचा जो रुट चौथ्या स्थानावर आहे. जो रुट याने हैदराबाद कसोटीत पाच विकेट घेतल्या आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये अक्षर पटेल सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत किती बदल ?
आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप 10 फलंदाजात विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराट कोहली आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद कसोटीमध्ये इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा ओली पोप याने 20 अंकाची उडी घेतली आहे. ओली पोप 15 व्या क्रमांकावर पोहचलाय. त्याशइवाय इंग्लंडचा सलामी फलंदाज बेन डकेट याच्या कर्मवारीतही बदल झालाय. बेन डकेट याने पाच क्रमांकाची झेप घेत 22 वे स्थान पटकावलेय.
इतर महत्वाच्या बातम्या