Ravi Shastri eyes on watching Nitish Kumar Reddy ton : वयाच्या 21व्या वर्षी ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणं प्रत्येकाला शक्य नाही, तेही त्याच्या कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात. पण ही कामगिरी नितीश कुमार रेड्डीने केली आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत नितीशने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.
नितीश रेड्डी यांच्या शतकानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या वडिलांना पण अश्रू अनावर झाले. नितीश रेड्डी यांच्याशिवाय आणखी एका व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून टीम इंडियाचा माजी कर्णधार रवी शास्त्री आहे. नितीशने शतक पूर्ण केले तेव्हा रवी शास्त्री कॉमेंट्री पॅनलमध्ये बसले होते आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.
नितीशच्या वडिलांसोबत रवी शास्त्रीही झाले भावूक
नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न कसोटीत शानदार खेळी खेळली आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले. मेलबर्नमध्ये नितीशने शतक झळकावताच स्टेडियममध्ये उपस्थित सर्व भारतीय चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. एकीकडे चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या तर दुसरीकडे दोघांचे अश्रू थांबत नव्हते. या दोन लोकांपैकी एक नितीशचे वडील मुत्याला रेड्डी आणि दुसरे रवी शास्त्री होते.
कॉमेंट्री पॅनलमध्ये रवी शास्त्री इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांच्यासोबत बसले होते. पठाण आणि सप्रू नितीशच्या खेळीबद्दल बोलत होते पण यावेळी रवी शास्त्री गप्प दिसले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. रवी शास्त्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नितीश रेड्डीने मेलबर्न कसोटीत ठोकले पहिले शतक
मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी ट्रबल-शूटर म्हणून उदयास आले. या दोन्ही खेळाडूंमध्ये 127 धावांची उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळाली. रेड्डीने 171 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. रेड्डीने चौकारासह शतक पूर्ण केले. नितीश रेड्डी 189 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. नितीश रेड्डी यांच्या शतकादरम्यान त्यांचे वडील खूप भावूक दिसले. रेड्डीच्या वडिलांनी क्रिकेटसाठी त्यांची नोकरी सोडली.
हे ही वाचा -