Ind vs Aus Border-Gavaskar Trophy : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी म्हणून खेळवला जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिस या सामन्याच्या मध्यावर जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. इंग्लिसची दुखापत खूपच गंभीर असून त्यामुळे तो सिडनीत होणाऱ्या पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या बदलीची ऑस्ट्रेलियाकडून लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जोश इंग्लिसला झाली दुखापत
cricket.com.auच्या वृत्तानुसार, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जोश इंग्लिस पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करत होता आणि यादरम्यान त्याला दुखापत झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या सर्व सामन्यांसाठी इंग्लिसचा अतिरिक्त फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. ट्रॅव्हिस हेड तंदुरुस्तीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर जाईल या भीतीमुळे इंग्लिसचा संघात समावेश करण्यात आला होता, पण हेडला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आणि इंग्लिसला बेंचवरच राहावे लागले.
ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सिडनीतील पाचव्या कसोटीसाठी बदली खेळाडूंची घोषणा योग्य वेळी केली जाईल, इंग्लिसला घरच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याच्या फिटनेस वर लक्ष असेल. अशा परिस्थितीत जोश इंग्लिस लवकर तंदुरुस्त झाला नाही तर त्याचा संघ पर्थ स्कॉचर्सला बिग बॅश लीगमध्ये मोठा फटका बसू शकतो. इंग्लिस हा पर्थ संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
हे ही वाचा -