Ravi Shastri On Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या बाजूने वक्तव्य केलं आहे. त्याच्याकडे बोटं दाखवण्यापूर्वी द्रविडला पुरेसा वेळ दिला पाहिजे, असं शास्त्री म्हणालेत. राहुल द्रविड 2021 साली भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्याने रवी शास्त्री यांची जागा घेतली होती. द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा त्यावेळी होती. बहुराष्ट्रीय स्पर्धांव्यतिरिक्त भारताला परदेशी भूमीवरही यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र द्रविडच्या कार्यकाळातील शेवटचे 16 महिने निराशाजनक राहिले आहेत. त्यामुळे आता काही लोक त्याच्या प्रशिक्षणावर शंका घेत आहेत. अशा परिस्थितीत रवी शास्त्री यांनी द्रविडचा बचाव केला आहे.


भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना सांगितले, 'या सर्वाला वेळ लागतो. मला पण वेळ लागला. राहुल द्रविडलाही वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी एक फायदा आहे की तो एनसीएमध्ये होता. तो भारत अ संघासोबतही होता आणि आता तो वरिष्ठ संघासोबत आहे. त्याला समकालीन क्रिकेटपटू आणि यंत्रणांचा अनुभव आहे. त्याला वेळ द्या. रवी शास्त्री पुढे म्हणाले की, "आपल्या देशातील लोकांची स्मरणशक्ती कमकुवत आहे. जिंकायचे असेल तर जिंकावेच लागेल. मी माझ्या कार्यकाळात दोन आशिया चषक जिंकले, पण कोणालाच आठवत नाही. कोणीतरी आशिया कपचा उल्लेख केला आहे का? आम्ही दोनदा जिंकलो आहोत आणि त्याबद्दल कोणीही बोलत नाही. मात्र आशिया चषक स्पर्धेत हरलो की स्पर्धेचे चित्र समोर येते. असं का?"


16 महिन्यांतही भारताची कामगिरी सुमार


राहुल द्रविडला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनून 16 महिने पूर्ण झाले आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर त्यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. द्रविडच्या कोचिंग नेतृत्वाखाली भारताला या काळात आशिया चषक आणि T20 विश्वचषक 2022 मध्ये पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी आणि वनडे मालिकाही गमवावी लागली होती. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हे सर्व राहुल द्रविडच्या कार्यकाळात घडले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :