Gautam Gambhir Slams KL Rahul's Critics : भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. पण मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 75 धावा करून टीम इंडियाला पराभूत होणारा सामना जिंकून दिला. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे त्याला पुन्हा टीकांना सामोरे जावं लागलं, अशा परिस्थितीत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने केएल राहुलच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरला 'स्पोर्ट्स तक'वर विचारण्यात आलं की, टीकेमुळे केएल राहुलवर आयपीएलपूर्वी दबाव असेल का? यावर गंभीरने उत्तर दिले, तो म्हणाला, “मला विचाराल तर केएल राहुल कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली असेल असं मला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल एकमेकांपासून वेगळे आहेत. आयपीएलमध्ये 1000 धावा केल्यानंतरही जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी केली नाही तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल. तसंच पुढे बोलताना तो म्हणाला, “शेवटी फक्त 15 खेळाडूंनाच भारताकडून खेळण्याची संधी मिळते. त्याच वेळी, आयपीएलमध्ये 150 हून अधिक खेळाडूंची निवड केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल याची तुलना करू नये. राहुलने आयपीएलमध्ये कशी कामगिरी केली आहे, टूर्नामेंटमध्ये त्याची 4-5 शतकं आहेत आणि तुम्ही अशा खेळाडूबद्दल बोलत आहात ज्याने 4-5 शतकं झळकावली आहेत.


'माजी खेळाडूंना सक्रिय राहण्यासाठी मसाला हवा'


आपला मुद्दा पुढे मांडत गंभीर म्हणाला, “आयपीएलच्या शेवटच्या मोसमात राहुलने मुंबईविरुद्ध शतक झळकावले होते. काही माजी खेळाडूंना सक्रिय राहण्यासाठी फक्त मसाला हवा असतो. त्यामुळे तुम्ही लोकांवर टीका करता. माझ्या मते केएल राहुल ज्या प्रकारचा खेळाडू आहे, तो कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली येणार नाही. एका खेळाडूमुळे तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. ड्रेसिंग रूममध्ये बसलेले 25 खेळाडू तुम्हाला स्पर्धा जिंकण्यात मदत करतात.असंही गंभीर म्हणाला.


दुसऱ्या वन-डेमध्ये राहुलची महत्त्वपूर्ण खेळी


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अवघ्या 39 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. त्यांची जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद 75 तर रविंद्र जाडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली. ज्यामुळेच भारत 39.5 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठून 5 विकेट्सनी विजयी झाला.  


हे देखील वाचा-