IND vs AUS, ODI Match Preview : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु एकदिवसीय सामन्यांतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या म्हणजेच 22 मार्च रोजी होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असल्याने आता तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. यंदाच्या वर्षीच एकदिवसीय चषक खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची आहे, तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...


सामना कधी होणार?


भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये उद्या म्हणजेच 22 मार्च रोजी सामना होणार आहे.


सामना कुठे होणार?


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर होणार आहे.


सामना किती वाजता सुरु होईल?


भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल.





सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल.  तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा


भारताने जिंकली कसोटी मालिका


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. कारण सामन्यासाठी मिळणाऱ्या पाचही दिवसांचा खेळ संपल्यावरही निकाल समोर न आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. पण मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने (Team India) मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली.


हे देखील वाचा-