एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईची 47 व्यांदा रणजी चषकाच्या फायनलमध्ये धडक, आता मध्य प्रदेशसोबत होणार लढत

Ranji trophy semi final 2022 : पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील मुंबईने रणजी चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. र

Ranji trophy semi final 2022 : पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील मुंबईने रणजी चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने 47 व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईने 4 बाद 533 धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावाच्या आधारावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता मुंबई आणि मध्य प्रदेशमध्ये मुकाबला होणार आहे. 

मुंबईचा पहिला डाव - 
उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक तोमर (113), यशस्वी जायस्वाल (100) यांची शतके. त्याचबरोबर शॅम्स मुलानी (50) याच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून कर्णधार करण शर्माने चार विकेट घेतल्या. तर सौरभ कुमारने दोन आणि यश दयाल याने दोन विकेट घेतल्या. 
 
उत्तर प्रदेशचा पहिला डाव - 
393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची सुरुवात निराशाजनक झाली. उत्तर प्रदेशने ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीपुढे उत्तर प्रदेशच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. उत्तर प्रदेशचा संपूर्ण डाव अवघ्या 180 धावांत संपुष्टात आला. उत्तर प्रदेशसाठी शिवम मावीने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर माधव कौशिकने 38 धावांची खेळी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीला एक विकेट मिळाली.  

मुंबईचा दुसरा डाव - 
पहिल्या डावात 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात झाली. मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि यशस्वी जायस्वाल यांनी दमदार सलामी दिली. पृथ्वी शॉ खोऱ्याने धावा खेचत असताना यशस्वी संयमी फलंदाजी करत होता. पृथ्वी शॉ 71 चेंडूत 64 धावा काढून बाद झाला. पृथ्वी बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालने मोर्चा सांभाळला.  अरमान जाफर आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकी खेळी करत मुंबईची आघाडी भक्कम केली. यशस्वी जायस्वलने 181 आणि अरमान जाफर याने 127 धावांची खेळी केली. सर्फराज खान (नाबाद 59) आणि सॅम्स मुलानी (नाबाद 51) यांनी अर्धशतकी खेळी केली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget