Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कोच गंभीर अन् कर्णधार रोहितचा हुकमी एक्का झाला फिट, आज उतरणार मैदानात
भारतीय संघ ज्याची वाट पाहत होता अखेर तेच घडलं, टीम इंडियाचा हुकमी एक्का फिट झाला आहे.
![Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कोच गंभीर अन् कर्णधार रोहितचा हुकमी एक्का झाला फिट, आज उतरणार मैदानात Ranji Trophy Kuldeep Yadav returns after surgery named in UP squad for MP clash ICC Champions Trophy Team India Cricket News Marathi Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कोच गंभीर अन् कर्णधार रोहितचा हुकमी एक्का झाला फिट, आज उतरणार मैदानात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/2dc9dcc43b7814ecdc6340480f968ba917382023515581091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ranji Trophy Kuldeep Yadav : चॅम्पियन्स ट्रॉफी आता फार दूर नाही. पुढील 3 आठवड्यात टीम इंडिया मैदानात उतरेल. पण, या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची चिंता आहे. 2024 मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेला बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि त्याच्या खेळण्याबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. पण टीम इंडियालाही काही दिलासा देणारी बातमी मिळत आहे, कारण स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमी परतला आहे आणि आता त्याच्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही तंदुरुस्त झाला आहे.
कुलदीप यादव बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाही. पण आता लवकरच हा चायनामन गोलंदाज टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसू शकतो. खरंतर कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. यापूर्वी, कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घेण्यात आली होती. आता असे मानले जात आहे की कुलदीप यादव उत्तर प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीत दिसू शकतो. गुरुवारपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघ इंदूरमधील होळकर स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील.
कुलदीप यादव इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार?
Kuldeep is making a return after a hernia surgery and hasn't played competitive cricket since October 2024
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 29, 2025
Full story: https://t.co/hDkp6nPLum pic.twitter.com/ITxH23cVUc
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुलदीप यादवच्या तंदुरुस्तीच्या समस्या असूनही त्याला संघाचा भाग बनवण्यात आले. मात्र, आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. याशिवाय, इंग्लंड एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला कुलदीप यादवने रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे अशी इच्छा आहे, जेणेकरून इंग्लंड मालिकेपूर्वी तो सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे सुनिश्चित करता येईल.
रणजी ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशचा संघ : आर्यन जुयाल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), करण शर्मा, अभिषेक गोस्वामी, माधव कौशिक, प्रियम गर्ग, ऋतुराज शर्मा, आदित्य शर्मा (यष्टिरक्षक), शिवम मावी, सौरभ कुमार, शिवम शर्मा, कृतज्ञ कुमार सिंग, विजय कुमार, अटल बिहारी राय, वैभव चौधरी, झीशान अन्सारी, कार्तिकेय जयस्वाल, कार्तिक त्यागी आणि कुलदीप यादव.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)