Ranji Trophy: 'उत्तर प्रदेशच्या युवा खेळाडूंसोबत चुकीचं घडतंय' भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, रणजी स्पर्धेत चार संघ खेळवण्याची मागणी
Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 38 संघांनी सहभाग घेतलाय.
Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 38 संघांनी सहभाग घेतलाय. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश (uttar pradesh) स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे (uttar pradesh sports welfare association) अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री मोहसिन रझा (mohsin raza) यांनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या चार संघाला खेळवण्यात यावं, अशी त्यांनी बीसीसीआयकडं (BCCI) मागणी केलीय. लोकसंख्येचा विचार करता या स्पर्धेत उत्तर प्रदेशचा (uttar pradesh) एक संघ पुरेसा नाही. महाराष्ट्र (maharashtra) आणि गुजरातचे उदाहरण देत त्यांनी उत्तर प्रदेशातही एकापेक्षा जास्त रणजी संघ (Ranji Trophy) असले पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलंय.
मोहसिन रझा (mohsin raza) यांनी पीटीआयसी (PTI) संवाद साधताना असं म्हटलंय की, “उत्तर प्रदेशमध्ये () चांगले युवा खेळाडू असतानाही त्यांना संधी मिळत नाही. महाराष्ट्र (maharashtra) राज्यातील महाराष्ट्र (maharashtra), विदर्भ आणि मुंबई (Mumbai) असे तीन संघ रणजीमध्ये खेळतात. तर, गुजरातकडून (Gujarat) सौराष्ट्र आणि बडोदा हे दोन संघ रणजीमध्ये सहभागी होतात. एकापेक्षा जास्त संघ असल्यानं अनेक खेळाडूंचा प्रतिभा समोर येईल. गुजरात (Gujarat), महाराष्ट्रासारखं (maharashtra) उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) चार संघ रणजीमध्ये खेळवले पाहिजेत". यासंदर्भात मोहसिन रझा यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहिलं आहे.
Ranji Trophy: मुख्यमंत्र्यांकडं 'क्रीडा सल्लागार परिषद' स्थापन करण्याची शिफारस
मोहिसन रझा (mohsin raza) यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांची भेट घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 'क्रीडा सल्लागार परिषद' स्थापन करण्याची शिफारस केली. खेळाच्या विकासासाठी सल्ला देणं हा त्याचा उद्देश आहे. या 'क्रीडा सल्लागार समिती'मध्ये विविध खेळांतील ज्येष्ठ व अनुभवी खेळाडूंचा समावेश करावा, ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये महिला खेळाडूंचा विशेष समावेश असेल.
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीचे शेवटचे पाच विजेते संघ:
2021-22 मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
2019-20 सौराष्ट्र (Saurashtra)
2018-19 विदर्भ (Vidarbha)
2017-18 विदर्भ (Vidarbha)
2016-17 गुजरात (Gujarat)
इतर महत्वाच्या बातम्या: