IPL Trade News 2026 : एकाच्या बदल्यात दोन! संजू सॅमसनसाठी CSK ने लावला जोर, हुकमी एक्का सोडणार? IPL लिलावाआधी सनसनाटी डीलची चर्चा
Sanju Samson Ravindra Jadeja Trade Marathi News : आयपीएल 2026 हंगामासाठीच्या रिटेन्शनची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतसे चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढत चालले आहेत.

IPL 2026 Trade Window Update News : आयपीएल 2026 हंगामासाठीच्या रिटेन्शनची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतसे चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढत चालले आहेत. बीसीसीआयकडून अद्याप रिटेन्शनची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी असा अंदाज व्यक्त केला जात आहे की नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत सर्व फ्रँचायझींनी आपल्या राखून ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची यादी सादर करावी लागेल.
मात्र, रिटेन्शनपूर्वी सध्या ट्रेड विंडो खुली आहे आणि त्यामुळेच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, या काळात असा एक ट्रेड चर्चेत आहे जो कायमस्वरूपी आठवला जाईल, कारण येथे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांदरम्यान तीन खेळाडूंचा मोठा ट्रेड डील चर्चेत आहे.
एकाच्या बदल्यात दोन! संजू सॅमसनसाठी CSK ने लावला जोर
अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्स (CSK) संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला (RR) दोन ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा आणि सॅम करन देऊ शकते. हा करार पूर्ण झाला, तर रवींद्र जडेजा तब्बल 17 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्सच्या संघात पुनरागमन करतील. सीएसके आणि आरआर या दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाने रवींद्र जडेजा, संजू सॅमसन आणि सॅम करन यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. करार जवळपास ठरत असल्याचे संकेत आहेत, मात्र अद्याप कोणत्याही फ्रँचायझीनं याबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्स आपला हुकमी एक्का सोडणार?
जर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी हा ट्रेड अधिकृत करायचा ठरवला, तर त्यांना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. नियमानुसार, खेळाडूंची लिखित संमती मिळाल्यानंतरच फ्रँचायझी अंतिम करारावर शिक्कामोर्तब करू शकतात.
संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा दोघेही आपल्या-आपल्या संघांशी अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी 11 वर्षे खेळला आहे, तर जडेजा गेली 12 हंगामे चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग राहिला आहे. सॅमसननं आधीच स्पष्ट केलं आहे की तो राजस्थान संघ सोडण्याचा निर्णय घेऊ इच्छितो.
रवींद्र जडेजानं आपल्या आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 254 सामने खेळले आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो विराट कोहली, एम.एस. धोनी, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या पाठोपाठ आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी त्यानं 143 विकेट्स घेतल्या आहेत, जे संघातील सर्वाधिक आहेत. आयपीएल 2022 हंगामात त्याला संघाचं नेतृत्वही देण्यात आलं होतं, पण संघाच्या निराशाजनक सुरुवातीमुळे त्यानं पुन्हा कर्णधारपद धोनीकडे परत सोपवलं होतं.
हे ही वाचा -





















