R Ashwin News : एक फोन कॉल... IPL मधून निवृत्ती घेतल्यानंतर आर अश्विनकडे आता मोठी संधी, 'या' देशाकडून मिळाली ऑफर
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

R Ashwin BBL debut News : भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, त्याचा क्रिकेटवरील जिव्हाळा अजूनही तितकाच कायम आहे. तब्बल 38 व्या वर्षीही अश्विन आता जागतिक टी20 लीगमधून आपल्या करिअरची नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, युएई मध्ये होणाऱ्या ILT20 लीगच्या पुढील हंगामासाठी अश्विन खेळण्यास इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्याने लिलावात आपले नाव नोंदवण्याचा विचार सुरू केला आहे. याचदरम्यान आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.
🚨CRICBUZZ EXCLUSIVE🚨
— Cricbuzz (@cricbuzz) September 2, 2025
Ravichandran Ashwin could be all set to become the first high-profile Indian cricketer to feature in the Big Bash League (BBL). And it could happen as early as the upcoming season pic.twitter.com/eaWx3rnCXb
अश्विनसमोर मोठा प्रस्ताव
क्रिकबझच्या वृत्तानुसार, अश्विन ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL) मध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करत आहेत. जर हे खरे ठरले, तर बिग बॅशमध्ये खेळणारे ते पहिले मोठे भारतीय क्रिकेटपटू ठरतील. बीसीसीआयच्या नियमानुसार सक्रिय भारतीय खेळाडूंना परदेशी टी20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी नसते, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अश्विनसमोर ही संधी खुली झाली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी स्वतः अश्विनला फोन केल्याचे मान्य केले आहे. त्यांनी सांगितले की, या करारावर काम सुरू आहे आणि तो प्रत्यक्षात आला तर त्यांना आनंद होईल. ग्रीनबर्ग म्हणाले, “अश्विनसारख्या दर्जेदार खेळाडूचा बीबीएलमध्ये सहभाग हा अनेक स्तरांवर लाभदायक ठरेल. तो एक चॅम्पियन क्रिकेटर आहे, जो बिग बॅश आणि आमच्या क्रिकेट समरला नक्कीच नवी उंची देईल.”
🚨 ASHWIN TO BIG BASH 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2025
- Ashwin could play in the BBL, it might happen as early as the upcoming season. [Cricbuzz] pic.twitter.com/EJR84nZIb5
मेलबर्नकडे वळू शकतात पावलं
ग्रीनबर्ग आणि अश्विन यांच्यातील चर्चा आता कोणाता आकार घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काही सूत्रांच्या मते, जर करार पक्का झाला तर अश्विन मेलबर्नच्या संघाशी जोडला जाऊ शकतो. सध्या ग्रीनबर्ग पुढील पाऊल उचलण्यासाठी क्लब्स आणि इतर हितधारकांशी चर्चा करत असून, एक प्रस्ताव तयार करून तो अश्विनसमोर ठेवण्याच्या तयारीत आहेत.
हे ही वाचा -





















