(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजधानीत षटकारांचं वादळ; युवराज सिंगसारखेच ठोकले 6 चेंडूत 6 षटकार, तुम्ही एकदा व्हिडिओ पाहाच
Priyansh Arya smashes six sixes in an over : दिल्लीत खेळल्या जात असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत षटकारांचे वादळ पाहिला मिळाले. एका फलंदाजाने युवराज सारखा पराक्रम केला असून त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले आहेत....
Priyansh Arya DPL 2024 : दिल्लीत खेळल्या जात असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL) फलंदाजांनी असा कहर केला आहे की, सगळेच हादरून गेले आहेत. डीपीएल 2024 मध्ये शनिवारी दुपारी दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात षटकारांचे वादळ पाहिला मिळाले. युवराज सिंगप्रमाणे एका फलंदाजाने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले आहेत.
हा पराक्रम दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचा युवा सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यने केला आहे. आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी आली. 23 वर्षीय प्रियांश आर्य सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला आणि त्याने स्फोटक शैली दाखवली. ज्यामुळे सगळेच थक्क झाले.
डावखुरा फलंदाज प्रियांश आर्य सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता, पण 12व्या षटकात त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारून अशी खळबळ उडवून दिली. उत्तर दिल्लीकडून मनन भारद्वाज गोलंदाजी करत होता. त्याने खूप प्रयत्न केले, पण प्रियांशला थांबवता आले नाही. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर प्रियांशने भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सामन्यात प्रियांशने 50 चेंडूत 120 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 10 षटकार मारले.
6️⃣ 𝐒𝐈𝐗𝐄𝐒 𝐢𝐧 𝐚𝐧 𝐨𝐯𝐞𝐫 🤩
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 31, 2024
There’s nothing Priyansh Arya can’t do 🔥#AdaniDPLT20 #AdaniDelhiPremierLeagueT20 #DilliKiDahaad | @JioCinema @Sports18 pic.twitter.com/lr7YloC58D
संघाचा कर्णधार आयुष बडोनीनेही धुमाकूळ घातला. प्रियांशसोबत त्याने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर षटकारांचे तुफान आणले. बडोनीनेही 55 चेंडूत 165 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या जबरदस्त फलंदाजी आणि झंझावाती शतकांच्या जोरावर दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने 20 षटकांत 308 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली.
दिल्ली प्रीमियर लीग 2024 मध्ये दक्षिण दिल्ली संघाने 5 विकेट गमावून 308 धावा केल्या. उत्तर दिल्लीला विजयासाठी 309 धावांचे लक्ष्य मिळाले. उत्तर दिल्लीचा एकही गोलंदाज धावांचा वेग रोखू शकला नाही. सिद्धार्थ सोलंकीने मात्र 3 बळी घेतले. त्याने 4 षटकात 52 धावा दिल्या. प्रांशु विजयरनने 4 षटकात 39 धावा देत 2 बळी घेतले.
प्रियांशला कमी अनुभव आहे. मात्र तो आतापर्यंत चांगली कामगिरी करताना दिसला आहे. प्रियांशने 5 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तेथे 9 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 248 धावा केल्या आहेत. प्रियांशने 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट टी-20 धावसंख्या 81 धावा आहे.
हे ही वाचा :