एक्स्प्लोर

IND vs NZ: जयपूरमधील टी-20 मॅचवर प्रदुषणाचं सावट, सामना होणार का?

india vs new zealand first t20 : नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे.

India v New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे.. अशातच जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक 364 इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जयपूरमधील टी-20 सामन्यावर परश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंडचा संघ यूएईतून भारतात दाखल झालाय. तर जयपूरमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात  भारतीय संघानं सराव सुरु केलाय.

युएईमधील विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय संघाला साखळी फेरतीच गाशा गुंडाळावा लागला. 11 महिन्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये पुढील टी20 विश्वचषक होणार आहे. त्याची बांधणी कऱण्यास भारतीय संघानं सुरुवात केली आहे. विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपलं आहे. त्याशिवाय रवी शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक पदाची सुत्रे स्विकारली आहेत. विश्वचषकात न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केला होता. याचा वचवा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. दरम्यान आठ वर्षानंतर जयपूरमध्ये आतंरराष्ट्रीय सामना होत आहे. त्यात दूषित हवामानामुळे सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याआधीही दोन वेळा भारतात प्रदुषित हवामानाचा सामना क्रिकेटला करावा लागला होता. 2017 मध्ये दिल्लीत भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. तर  2019 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील खेळाडूंना मास्क घालून सराव करावा लागला होता. उद्या होणाऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक :
टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी आलाय.  17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. 17 तारखेला जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 तारखेला रांचीमध्ये दुसरा तर कोलकातामध्ये तिसरा टी-20 सामना होणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे.  

भारताचा टी20 संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव , ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget