Pakistan Womens Leauge : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच बीसीसीआयची कॉपी करताना पाहायला मिळते. भारतात आयपीएल सुरु झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. आता बीसीसीआयने वुमन्स प्रिमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये या स्पर्धेची कॉपी करण्यात आली आहे. पाकिस्तानने वमन्स प्रीमियर लीगच्या धर्तीवर पाकिस्तान वुमन्स लीग या स्पर्धेचं आयोजन केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. यावरुन भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डने केली बीसीसीआयची कॉपी!


पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पाकिस्तान वुमन्स लीग स्पर्धेचं आयोजन केले आहे. त्यासाठी दोन संघ निवडण्यात आले आहे. एका संघाचं नाव अमेजन आहे तर दुसऱ्या संघाचं नाव सुपर वुमन्स असे ठेवण्यात आले आहे. दोन्ही संघामध्ये तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत.  बिस्माह मरूफ अमेजन संघाची कर्णधार आहे तर सुपर वुमन्स संघाची कर्णधार निदा दार असेल.  पाकिस्तान वुमन्स लीग स्पर्धेत डॅनी व्यात, लॉरेन विनफील्ड हील आणि लॉरा वूलवार्ट यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सामील होऊ शकतात.  


पाकिस्तान वुमन्स लीगचं वेळापत्रक -


8 मार्च- अमेजन विरुद्ध सुपर वुमन्स, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम,दुपारी 2 वाजता
10 मार्च- अमेजन विरुद्ध सुपर वुमन्स, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, दुपारी 2 वाजता
11 मार्च- अमेजन विरुद्ध सुपर वुमन्स, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, दुपारी 2 वाजता






पाकिस्तान वुमन्स लीगमधील अमेजन संघ कसा असेल -


बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाज, अनम अमीन, अरीशा नूर, आयमन फातिमा, फातिमा खान, फातिमा सना, गुलाम फातिमा, गुल फिरोजा, कायनात इम्तियाज, लॉरा डेलानी (आयरलँड), लॉरेन विनफील्ड-हिल (इंग्लंड), माइया बाउचियर ( इंग्लंड), नाशरा संधू, सदफ शमास, टैमी ब्यूमोंट (इंग्लंड), टेस फ्लिंटॉफ (ऑस्ट्रेलिया) आणि उम्म-ए-हानी






आणखी वाचा 


International Women's Day 2023 : फ्रीमध्ये पाहता येणार गुजरात जायंट्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू WPL सामना