WPL 2023: आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 च्या निमित्तानं, महिला प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून सर्व क्रीडाप्रेमींसाठी खास भेट दिली जाणार आहे. सर्व महिला प्रीमियर लीगचे सामने विनामूल्य पाहण्याची संधी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दिली जाणार आहे. यादरम्यान, 8 मार्च रोजी गुजरात जायंट्स (Gujarat Giants) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणाऱ्या सामन्यात प्रवेश विनामूल्य असेल. 


ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) 8 मार्च रोजी होणाऱ्या गुजरात जायंट्स (Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्यात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. काल WPL मध्ये झालेल्या सामन्यात यासंदर्भात माहिती दिली होती. आयोजकांनी दिलेल्या माहितीत, ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असेल, असं सांगण्यात आलं आहे.






दरम्यान, महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन अनेक अर्थांनी अनोखा असणार आहे. परंतु ही स्पर्धा ज्या प्रकारे वेगळी दिसतेय, त्यामुळे लोकांची या स्पर्धेसंदर्भात नक्कीच उत्सुकता वाढेल, असं दिसतंय. गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील ब्रेबॉर्न स्टेडियमवर जागतिक महिला दिनानिमित्त होणारा सामना विनामूल्य असेल. 


सर्व क्षेत्रात महिलांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं वुमेन्स प्रीमियर लीगनं आंतरराष्ट्रीय महिला दिनी सर्व क्रीडरसिकांना विनामुल्य सामना पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.