Ind vs Aus : सामन्याची एक दिवसआधी ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा! पिंक बॉल टेस्टसाठी Playing-11 केली जाहीर, 'या' खेळाडूला मिळाली संधी
IND vs AUS 2nd Test Australia Playing 11 : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
IND vs AUS Pink Ball Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यावर सर्वांच्या नजरा यजमान संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, ज्यांना या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल जाहीर केला आहे.
पर्थ कसोटी सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे, जेव्हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ॲडलेड कसोटीपूर्वी बाहेर पडला होता. आता त्याच्या जागी दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत स्कॉट बोलंडचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केल्याची पुष्टी केली आहे. या बदलाशिवाय ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल झालेला नाही. स्कॉट बोलंडने 2023 मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर आता 519 दिवसांनंतर तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या प्लेइंग 11 मध्ये सामील झाला आहे.
JUST IN: Skipper Pat Cummins confirms one change for Australia for the second Test #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) December 5, 2024
Details: https://t.co/Q0VdwRyLQs pic.twitter.com/IklVy2a5Zc
भारताविरुद्धच्या पिंक बॉलच्या सराव सामन्यात स्कॉट बोलंडने पंतप्रधान इलेव्हन संघाचे नेतृत्व केले. त्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. तो पहिल्यांदाच भारताविरुद्ध पिंक बॉल टेस्ट खेळणार आहे. याआधी तो भारताविरुद्ध लाल चेंडूने 2 कसोटी खेळला आहे, ज्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉट बोलंडच्या एकूण कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी 10 कसोटीत 35 बळी घेतले आहेत.
डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वरचष्मा
ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 12 डे-नाईट कसोटी खेळल्या आहेत. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 66 विकेट घेतल्या आहेत. पिंक बॉलसह स्टार्कची सरासरी 18.71 आहे आणि त्याने तीन पाच विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर नॅथन लिऑनने 43 विकेट घेतल्या आहेत. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने सात कसोटी सामन्यांमध्ये 34 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये सामन्यातील 10 बळींचाही समावेश आहे. बोलंडने दोन डे-नाईट कसोटीत सात विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन Playing-11 : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.