Pat Cummins Mother Passed Away : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) आईचं निधन झालं आहे. कमिन्सच्या आईने गुरुवारी (9 मार्च) रात्री अखेरचा श्वास घेतला. पॅटच्या आईच्या निधनाबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेटने ट्वीट करत माहिती दिली असून खेळाडूंनी देखील याबाबत शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडू काळ्या पट्ट्या हाताल बांधून मैदानात उतरले आहेत. ही माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी खेळाडूंना दिली असून पॅट कमिन्सची आई मारिया यांचं स्तनाच्या कर्करोगामुळे निधन झालं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला शोक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या आईच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मंडळाने आपल्या निवेदनात लिहिले आहे. मारिया कमिन्सच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. 'ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वतीने, आम्ही पॅट कमिन्स कुटुंब आणि त्यांच्या मित्रांप्रती संवेदना व्यक्त करतो' पॅट कमिन्सच्या आईला आदरांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू आज काळ्या हातपट्ट्या घालून मैदानात उतरतील.
कमिन्स मालिका सोडून ऑस्ट्रेलियाला परतला
पॅट कमिन्सने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या आईची प्रकृती खालावली. आईची काळजी घेण्यासाठी तो मालिका सोडून ऑस्ट्रेलियाला परतला. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. त्याचवेळी इंदूर कसोटीत कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाची WTC फायनलमध्ये एन्ट्री
इंदूर कसोटी सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्या तरीही ऑस्ट्रेलिया फायनल्समध्ये आपल्या स्थानी स्थिर असेल. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा-