IND vs AUS Test, Usman Khawaja : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबाद इथे सुरु आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) नवा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाचा तब्बल 22 वर्षांनी भारतात भीम पराक्रम करत अनोखा विक्रम नावावर केला आहे. उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडन याच्यानंतर भारतात 150 धावा करणारा पहिलाच सलामीवीर ठरला आहे. तसेच भारतात दीडशतकी खेळी करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हेडनने 2001 मध्ये द्विशतकी खेळी केली होती.


हेडननंतर 150 धावा करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन सलामीवीर


उस्मान ख्वाजाने भारताविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात 150 धावा पूर्ण केल्या आहेत. ख्वाजाने 346 चेंडूत 20 चौकारांसह 150 धावा पूर्ण केल्या. ख्वाजाने कसोटी सामन्यामध्ये पाचव्यांदा विक्रमी खेळी केली आहे. ख्वाजाने 150 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करण्याची कसोटी क्रिकेटमधील ही पाचवी वेळ आहे. गेल्या 8 डावात ख्वाजाने दुसऱ्यांदा हा आकडा गाठला आहे. 


उस्मान ख्वाजाची शानदार खेळी


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्या ख्वाजाने 146 चेंडूत शतक पूर्ण केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर ख्वाजा 104 धावांवर नाबाद होता. कॅमेरुन ग्रीनसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 150 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. ख्वाजा आणि कॅमरुन यांची ही भागीदारी या कसोटी मालिकेतील शानदार ठरली आहे.


150 रन करणारा चौथा सलामीवीर


ख्वाजाने या 150 रनांच्या नाबाद खेळीसह आणखी एक विक्रम नावावर केला आहे. उस्मान ख्वाजा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतात 150 पेक्षा जास्त धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. या आधी भारतात फक्त तीन सलामीवीरांना हा आकडा गाठता आला आहे. अहमदाबादमध्ये दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या ख्वाजा 150 धावांवर नाबाद आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा भारतातील कसोटी सामन्यात 150 धावा करणारा 21 व्या शतकातील दुसरा ऑस्ट्रेलियन सलामीवीर आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करणारा उस्मान ख्वाजा याधीच्या भारत दौऱ्यावेळी अहमदाबाद टेस्ट सीरिजवेळी पाणी वाटण्याचं काम करत होता. पण यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात दमदार खेळी करत नवा विक्रम केला आहे. उस्मान ख्वाजाने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 150 धावांचा टप्पा ओलांडला.