Ind vs Aus World Test Championship: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) नऊ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला (Team Australia) विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे खेळाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात (3 मार्च) कांगारूंनी अगदी सहज गाठलं. आता दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


ऑस्ट्रेलियन संघानं शानदार विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (2021-23) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता अहमदाबाद कसोटी जिंकणं भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघ जिंकला तर अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करेल. 


अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास काय होईल? 


अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहिला, तर टीम इंडियासमोर संकट येऊ शकतं. अशा स्थितीत श्रीलंकेसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपचे दरवाजे उघडतील आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकून ते अंतिम फेरीत पोहोचतील. 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकली तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण, यासाठी टीम इंडिया देवाचा धावा करावा लागेल. कारण अशा परिस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपची फायनल गाठायची असेल, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकणं किंवा अनिर्णित ठेवणं गरजेचं आहे. तरच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. असं असलं तरी घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.


ऑस्ट्रेलियानं गाठलीये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 


इंदूर कसोटी सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्या तरिही ऑस्ट्रेलिया फायनल्समध्ये आपल्या स्थानी स्थिर असेल. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pitch Rating : खेळपट्टी तयार करण्यात टीम इंडियाच्या हस्तक्षेपावर भडकला माजी क्रिकेटर, म्हणाला....