IPL 2025 Mumbai Indians : सर्व फ्रँचायझी आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रशिक्षक, कर्णधार बदलण्यापासून ते खेळाडूंच्या कायम ठेवण्याच्या यादीपर्यंत फ्रँचायझी तयार करत आहेत. आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला लवकरच नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. मुंबई इंडियन्स ज्या दिग्गजांना ही मोठी जबाबदारी देणार आहे, त्यांनी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.


पारस म्हांबरे होणार एमआयचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे मुंबई इंडियन्सचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती मुंबई इंडियन्सकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पारस म्हांबरे याने दीर्घकाळ टीम इंडियाच्या गोलंदाजांना प्रशिक्षण दिले आहे. त्याने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांना तयार केले होते.


अहवालानुसार, माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि टीए शेखर यांच्यासोबत पाच वेळच्या चॅम्पियन संघासाठी नव्या भूमिकेत सामील होतील. म्हांबरे यांच्या सहभागाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र ते संघाशी 'लिंक' असल्याचे समजते.


गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी होती खराब 


आयपीएल 2024 मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सला आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करायचे आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करत आहे, जो सध्याच्या सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. आता म्हाब्रेच्या सहवासामुळे आयपीएल 2025 मधील त्याच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.


आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा प्रवास


आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त फक्त चेन्नई सुपर किंग्ज 5 वेळा चॅम्पियन बनले आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2019, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत त्यांची पाचही विजेतेपदे जिंकली, ज्यामुळे तो धोनीसह आयपीएलमधील संयुक्त-सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनला. आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते, पण हा बदल अपेक्षेप्रमाणे झाला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 च्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.


हे ही वाचा -


Tilak Varma : तिलक वर्मा असणार टीम इंडियाचा कर्णधार; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संघात संधी


India Highest T20 Score : 300 धावा हुकल्या, पण विजयादशमीला टीम इंडियाने इतिहास रचला! टी-20 मध्ये केला 'हा' मोठा पराक्रम