India make 2nd highest T20I score against Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 297 धावा केल्या. 300 धावा हुकल्या, पण विजयादशमीला टीम इंडियाने इतिहास रचला. पूर्ण सदस्य राष्ट्रातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा रेकॉर्ड मोडला आहे. अफगाणिस्तानने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 278 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या शानदार खेळीमुळे भारताने या सामन्यात एवढी मोठी धावसंख्या उभारली.
संजू-सूर्याने बांगलादेशला धू-धू धुतलं
या सामन्यात संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली आहे. संजूने 47 चेंडूत 111 धावा केल्या. याशिवाय सूर्याने या सामन्यात 35 चेंडूत 75 धावांची खेळीही खेळली. या दोन फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 70 चेंडूत 173 धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसऱ्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी आहे. या भागीदारीमुळे भारतीय संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली. याशिवाय हार्दिक पांड्यानेही अप्रतिम फलंदाजी केली आहे. या सामन्यात त्याने 18 चेंडूत 47 धावा केल्या. रियान परागही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने 13 चेंडूत 34 धावा केल्या.
टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या करणारा पूर्ण सदस्य राष्ट्र
भारत - 297/6
अफगाणिस्तान - 278/3
इंग्लंड - 267/3
ऑस्ट्रेलिया - 263/3
श्रीलंका - 260/3
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या
पूर्ण सदस्य राष्ट्राव्यतिरिक्त, जर आपण संपूर्ण जगाबद्दल बोललो तर टी -20 आंतरराष्ट्रीय मधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. नेपाळ संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. नेपाळने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी भारतीय संघ अवघ्या 18 धावांनी कमी होता.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे देश
नेपाळ - 314/3
भारत - 297/6
अफगाणिस्तान - 278/3
झेक प्रजासत्ताक – 278/4
मलेशिया - 268/4
हे ही वाचा -
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के