AUS vs PAK : पाकिस्तानने उतरला कांगारूंचा माज! 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली वनडे मालिका, रचला इतिहास
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकून एक वर्षही उलटले नाही आणि मायदेशात त्यांना अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Pakistan Win ODI Series In Australia : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकून एक वर्षही उलटले नाही आणि मायदेशात त्यांना अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत करून नवीन विक्रम केला आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला, पण त्यानंतर पाकिस्तानने पलटवार करत दोन्ही सामने जिंकून इतिहास रचला. दुसरा एकदिवसीय सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला, ज्यात पाकिस्तानने 9 गडी राखून शानदार विजय नोंदवला होता. आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठी कामगिरी केली आहे.
पाकिस्तान संघाने रचला इतिहास
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना 31.5 षटकात अवघ्या 140 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3, तर शेवटच्या सामन्यात हारिस रौफने 2 बळी घेतले. यानंतर पाकिस्तानने 2 गडी गमावून 141 धावांचे लक्ष्य गाठले. सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवान 30 आणि बाबर आझम 28 धावा करून नाबाद परतला.
पाकिस्तान संघाच्या या विजयाचा अंदाज यावरून लावता येतो की, संघाला 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकण्यात यश आले आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. जर आपण दिवसांच्या संदर्भात पाहिले तर पाकिस्तानने 8,187 दिवसांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडे मालिकेत प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. एवढेच नाही तर आपल्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे.
- PAK won an ODI series in AUS.
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2024
- SL won an ODI series vs IND.
- NZ won a Test series in IND.
- SA won a Test series in BAN.
- PAK won a Test series at home.
Incredible things happening in World Cricket 🤯⚡ pic.twitter.com/SRLERdVlMK
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानची कामगिरी
- 2024 मध्ये पाकिस्तान 2 - 1 ऑस्ट्रेलिया
- 2017 मध्ये पाकिस्तान 1 - 4 ऑस्ट्रेलिया
- 2010 मध्ये पाकिस्तान 0 - 5 ऑस्ट्रेलिया
- 2002 मध्ये पाकिस्तान 3 - 2 ऑस्ट्रेलिया
या संपूर्ण मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. हरिस रौफने 3 सामन्यात 10 तर शाहीन आफ्रिदीने 8 विकेट घेतल्या. नसीम शाहला 5 विकेट घेण्यात यश आले. मोहम्मद हसनैनने 3 बळी घेतले. सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल हारिस रौफला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा -