Ind vs Pak Asia Cup 2025 : भारताच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले! संघात ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ची एन्ट्री, तर प्रेस कॉन्फरन्स रद्द
आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची क्रिकेट टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Pakistan Cancel Press Conference Before India Match : आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची क्रिकेट टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 21 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यापूर्वी पाकिस्तानने आपली अधिकृत पत्रकार परिषद रद्द केली आहे, ज्यामुळे संघातील अंतर्गत दबाव दिसून येतो. यापूर्वीही संघाने युएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपली पत्रकार परिषद देखील रद्द केली होती.
Asia Cup: Drama continues as Pakistan cancels pre-match press conference before India clash
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2025
Read @ANI Story | https://t.co/CkpCDTZOpA#indiavspakistan #AsiaCup #AsiaCup2025 pic.twitter.com/EQEQPXVzJa
संघात ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ची एन्ट्री
गट टप्प्यात भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर हा वाद सुरू झाला. भारताने पाकिस्तानला सात गडी राखून हरवले होते. त्याहूनही मोठा धक्का म्हणजे भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास आणि मनोबल खूपच कमी झाले. खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी टीम मॅनेजमेंटला अगदी मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. राहील यांना बोलवावे लागले. संघाची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यांना स्पर्धेच्या मध्यात मोटिव्हेशनल स्पीकर्सची आवश्यकता लागली.
मैदानाबाहेरचे वादही चव्हाट्यावर
भारत-पाकिस्तान सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनलाही बहिष्कार घातला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात तक्रार केली. भारतीय खेळाडूंवर कारवाई न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) संतापले आणि स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर यूएईविरुद्धचा सामना मुद्दाम उशिरा सुरू करून त्यांनी आपला विरोध नोंदवला.
आयसीसीची कारवाई शक्य
वादांची शिखरे तेव्हा गाठली गेली, जेव्हा पाकिस्तानने पायक्रॉफ्ट यांच्यासोबत झालेल्या मिटिंगचे गुपचूप रेकॉर्डिंग करून ऑनलाईन टाकली. ही मिटिंग प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया (PMOA) मध्ये झाली होती, जेथे मोबाईल वा कॅमेरे नेणे कडक बंदी असते. त्यामुळे आता आयसीसी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईचा विचार करत आहे.'
आशिया कप 2025 सुपर 4 चे संपूर्ण वेळापत्रक
- 20 सप्टेंबर (शनिवार) - पहिला सामना - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (दुबई)
- 21 सप्टेंबर (रविवार) - दुसरा सामना - भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
- 23 सप्टेंबर (मंगळवार) - तिसरा सामना - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (अबू धाबी)
- 24 सप्टेंबर (बुधवार) - चौथा सामना - भारत विरुद्ध बांगलादेश (दुबई)
- 25 सप्टेंबर (गुरुवार) - पाचवा सामना - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (दुबई)
- 26 सप्टेंबर (शुक्रवार) - सहावा सामना - भारत विरुद्ध श्रीलंका (दुबई)
- 28 सप्टेंबर (रविवार) - अंतिम सामना - दुबईमध्ये
टीप : सर्व सामने युएई वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता खेळले जातील, परंतु भारतात रात्री 8 वाजता.
हे ही वाचा -





















