Pakistan vs New Zealand 1st T20 : पहिल्या टी20 सामन्यामध्ये पाकिस्तानने (PAK) न्यूझीलंडचा (NZ) 88 धावांनी पराभव केला आहे. हा सामना लाहौरमधील गद्दाफी स्टेडियम खेळवण्यात आला. रोमहर्षक सामन्यात (PAK vs NZ) न्यूजीलंडने फक्त 6 धावांमध्ये 5 विकेट गमावले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) या सामन्यात सर्वाधिक 4 गडी बाद केले. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला 5 टी-20 सामने आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
पाकिस्तानचा पहिल्या टी20 सामन्यात 88 धावांनी विजय
पाकिस्तानच्या लाहौर येथील गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड पहिला टी20 सामना पार पडला. शुक्रवारी रात्री झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 88 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने नाणेफक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत 182 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुणा किवी संघ न्यूझीलंड अवघ्या 94 धावांत सर्वबाद झाला. अशाप्रकाने पाकिस्तानने मालिकेतील पहिला सामना जिंकला.
पाकिस्तान संघाकडे मालिकेत 1-0 ने आघाडी
न्यूजीलंडने फक्त 6 धावांमध्ये गमावले 5 विकेट
पाकिस्तानने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 'किवी' न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर चाड बोवेस 1 आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विल यंग 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिशेल 11 आणि कर्णधार टॉम लॅथम 20 हेही पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूजीलंडने फक्त 6 धावांमध्ये 5 विकेट गमावले.
रौफने 17 धावा देत घेतले चार बळी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने चमकदार कामगिरी केली. रौफने 3.3 षटकात अवघ्या 17 धावा देत चार बळी घेतले. अवघ्या सहा धावांमध्ये किवींने 5 गडी गमावले. त्याआधी पाकिस्तानने फलंदाजी करताना युवा सईम अय्युबने 28 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच, फखर जमाननेही 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका 2023 : सामने आणि वेळापत्रक
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी20 सामना : 14 एप्रिल 2023 - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी टी20 सामना : 15 एप्रिल 2023 - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा टी20 सामना : 17 एप्रिल 2023 - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, चौथा टी20 सामना : 20 एप्रिल 2023 - रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, पाचवा टी20 सामना : 24 एप्रिल 2023 - रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
महत्त्वाच्या इतर बातम्या :