Suryakumar Yadav Top in ICC Rankings : आयसीसी टी20 (ICC T20) फलंदाजी क्रमवारीत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) पहिलं स्थान कायम राखलं आहे. आयपीएल 2023 मध्ये भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमारला आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो तीन सामन्यांत 15, 01, 00 धावा करून बाद झाला. पण असं असलं तरी आयसीसी टी20 (ICC T20) रॅकिंगमध्ये सूर्यकुमार यादव आघाडीवर कायम आहे.


ICC Player Rankings : आयसीसी टी20 रॅकिंगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल


आयसीसी टी20 (ICC T20 Rankings) च्या बुधवारी (12 एप्रिल) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव 906 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यामागोमाग पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 811 गुणांसह दुसऱ्या आणि कर्णधार बाबर आझम (755) हा तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम 748 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच न्यूझीलंडच्या डिवॉन कॉनवे 745 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 


ICC Player Rankings : टॉप 10 मध्ये सूर्यकुमार एकमेव भारतीय खेळाडू


महत्त्वाचं म्हणजे टॉप 10 मध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) एकमेव भारतीय खेळाडू असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्याने आयपीएलमध्ये (IPL 2023) मोठी धावसंख्या नोंदवली नसली तरी टी20 यादीतील अव्वल स्थानात बदल झालेला नाही. सूर्यकुमार यादवला आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो तीन सामन्यांत 15, 01, 00 धावा करून बाद झाला. 


Top 5 ICC Player Rankings : आयसीसी टी20 (ICC T20) फलंदाजी क्रमवारी


1. सर्यकुमार यादव (भारत) : 906


2. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) : 811


3. बाबर आझम (पाकिस्तान) : 755


4. एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) : 748 


5. डिवॉन कॉनवे (न्यूझीलंड) : 745


Virat Kohli ICC T20 Ranking : विराट कोहली 'या' क्रमांकावर


आयसीसी टी20 क्रमवारीत टॉप-10 फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव हा एकमेव भारतीय आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli ICC Ranking) स्थानात कोणताही बदल झालेला नाही. आयसीसी टी20 फलंदाजांमध्ये कोहली अजूनही 15 व्या क्रमांकावर स्थिर आहे. 


गोलंदाजांमध्ये राशिद खान आघाडीवर


आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा 22 वर्षीय फिरकी गोलंदाज महिष तिक्षकाने टी20 गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. टॉप-10 बॉलिंग टी-20 रँकिंगमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : हैदराबादची विजयानंतर गुणतालिकेत झेप, पहिल्या क्रमांकावर कोण? पॉईंट्स टेबलमधील अपडेट जाणून घ्या