ICC World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 यंदा भारतात होत आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (ICC World Cup) यंदाचा 13 वा हंगाम भारतात (India) ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून सात संघ यासाठी पात्र ठरले आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकदिवसीय विश्वचषक 1975 पासून खेळला जात आहे. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेचे 12 हंगाम झाले आहेत. यंदाचा 13 वा हंगाम असेल.


भारतीय संघाला 12 वर्षांनंतर इतिहासाच्या पुनरावृत्तीची संधी


टीम इंडियाला (Team India) 2011 नंतर विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारताने  2011 मध्ये घरच्या मैदानावर खेळलेल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलं होतं. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला 12 वर्षांनंतर या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. यात एकूण 10 संघ सहभागी होत असून अंतिम फेरीसह एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने दोनदा विश्वचषक जिंकला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विजेतेपद पटकावलं होतं.


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सात संघ पात्र


आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 10 पैकी 7 संघांनी स्थान मिळवलं आहे. भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा यामध्ये समावेश आहे. सहाव्या संघाचा निर्णय पुढील महिन्यात बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकनंतर होईल. जर आयर्लंड संघाने मालिकेत क्लीन स्वीप केला तर विश्वचषकात त्यांचं स्थान निश्चित होईल. याउलट आयर्लंडने एकही सामना गमावल्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामने खेळले जाऊ शकतात. 


प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागतील


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम दोन संघ क्वालिफायरद्वारे निश्चित केले जातील. यामध्ये श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसह एकूण 10 संघ सहभागी आहेत. आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील एका संघाला पात्रता फेरीत प्रवेश करावा लागणार आहे. 18 जून ते 9 जुलै या कालावधीत झिम्बाब्वेमध्ये पात्रता सामने खेळवले जातील. यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाईल. म्हणजेच सर्व संघांना 9 विरोधी संघांविरुद्ध सामने खेळावे लागतील. म्हणजेच एका संघाला 9 सामने खेळावे लागतीय. यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत जातील. इंग्लंड संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद