Shan Masood Wicket Controversy Pakistan vs Bangladesh Test : क्रिकेटच्या मैदानावरील रोमांचक सामन्यांदरम्यान पंचांच्या अनेक निर्णयांवर गोंधळ होतो. बुधवारपासून सुरू झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. रावळपिंडी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद अशा प्रकारे आऊट झाला की त्याच्या विकेटवरून वाद झाला. विकेट गमावल्यानंतर शान स्वतः नाराज दिसला आणि तो अंपायरशी भिडला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...






सातव्या षटकात गोंधळ


त्याचे असे झाले की, शान मसूद तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण तो 11 चेंडूत 6 धावा करून शरीफुल इस्लामच्या चेंडूवर बाद झाला. सातव्या षटकात शरीफुल इस्लामने पाचवा चेंडू टाकला, तेव्हा हा चेंडू शान मसूदच्या बॅट आणि पॅडमधून गेला. चेंडू गॅपमधून बाहेर येताच मागे उभ्या असलेल्या बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दासने त्याचा झेल घेतला. हा झेल पाहून बांगलादेशची टीमने आनंदाने उडी मारली, पण मैदानी पंचांनी आऊट देण्यास स्पष्ट नकार दिला.  






निर्णयामुळे कर्णधार संतापला 


यानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने डीआरएस घेतला. ज्यामध्ये थर्ड अंपायरला असे वाटले की गॅपमधून बाहेर जाताना चेंडू बॅटच्या काठाला लागला आहे. खरंतर, हे प्रकरण देखील थोडे गोंधळात टाकणारे होते. कारण चेंडू बॅटपासून काही अंतरावर गेल्यानंतरच स्पाइक दिसत होता. यानंतर थर्ड अंपायरने त्याचा निर्णय घेत शानला आऊट ठरवले. शानला आऊट घोषित करताच तो चिडला. याबाबत तो पंचांशी भिडतानाही दिसला. तो मैदानावरील पंचांशी वाद घालताना दिसला.


त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही X वर शानच्या विकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओ पाहिल्यास चेंडू बॅटच्या पुढे जाऊन पॅडवर लागल्याचे स्पाइक झाले. पण तरीही तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केले. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.









संबंधित बातमी :


Yashasvi Jaiswal : जैस्वालचा संपणार नाही वनडेतला वनवास? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार नाही संधी; स्टार खेळाडूने सांगितले कारण

फक्त 2 चेंडूत खेळ खल्लास! 'अरे, त्याला झिम्बाब्वेविरुद्ध खेळवा...' बाबर आझम होतोय ट्रोल

Jaydev Unadkat : 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय, आता 'या' देशात खेळणार क्रिकेट