ICC Champions Trophy 2025 India Squad : टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माचे पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेला बराच वेळ शिल्लक असतानाही खेळाडूंच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील बहुतेक खेळाडूंना कायम ठेवण्याची चर्चा जास्त होत आहे. पण सध्या यशस्वी जैस्वाल हे एक नाव आहे. ज्याने आपल्या गेल्या वर्षी कसोटी आणि टी-20 मध्ये कारकिर्दीची चांगली सुरुवात केली, पण त्याला अद्याप एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पार्श्वभूमीवर भारताच्या सलामीच्या कॉम्बिनेशनवर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले आहे की, यशस्वी जैस्वाल 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग असेल, परंतु सध्या त्याला सलामीवीर म्हणून प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण आहे.
कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल अजूनही वनडेमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे. शेवटच्या टी-20 वर्ल्ड 2024 मध्ये विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग केल्यामुळे यशस्वीला बाहेर बसावे लागले होते.
क्रिकबझवरील संभाषणात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय खेळाडूंच्या निवडीवरील प्रश्नांची उत्तरे देताना दिनेश कार्तिक म्हणाला, "ओपनर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी उत्कृष्ट आहे. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल बॅकअप सलामीवीर म्हणून संघात सामील होऊ शकते. जर शुभमनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही तर अशा परिस्थितीत जैस्वाल नक्कीच संधी मिळेल." पण एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सलामी दिली होती. गिलने या स्पर्धेत 354 धावा केल्या होत्या.
यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ फक्त तीन एकदिवसीय सामने खेळणार असल्याचे कार्तिकने म्हटले आहे. अशा स्थितीत सलामीच्या जोडीचा प्रयोग होण्याची शक्यता फारच कमी आहे. तो म्हणाला, 'भारत त्यांच्या सलामीच्या जोडीवर जास्त प्रयोग करणार नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांच्याकडे फक्त काही सामने शिल्लक आहेत.' त्यामुळे जैस्वालला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी कधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरही संकट
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा निर्णयही आयसीसीला घ्यायचा आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण आयोजन करेल की हायब्रीड मॉडेल स्वीकारेल याबाबतचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, कारण बीसीसीआयने पाकिस्तान न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने भारताच्या खेळांचा विचार करणाऱ्या वेळापत्रकाचा मसुदा आधीच आयसीसीकडे सादर केला आहे. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये संभाव्य सेमीफायनल आणि फायनलसह भारत त्यांचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मार्की सामना 1 मार्च रोजी होणार आहे.