Hockey player Birendra Lakra accused of murder: आंतरराष्ट्रीय हॉकीपटू बीरेंद्र लाक्रावर (Birendra Lakra ) त्याचा बालपणीचा मित्र आनंद टोप्पोच्या (Anand Tappo) हत्येचा आरोप आहे. ज्याचा याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मृत्यू झालाय.  मृत आनंद टोप्पोचे वडील बंधन टोप्पो यांनी हा केलाय. आनंद टोप्पोच्या हत्येत बिरेंद्र लाक्रा आणि त्याचा मित्र मनजीत टेटे यांचा हात असल्याचा बंधन टोप्पो यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. या प्रकरणी बंधन टोप्पोनं भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलिस ठाण्यात आपल्या मुलाच्या हत्येची तक्रार दाखल केलीय. 


लग्नाच्या दहा दिवसानंतर मृत्यू
बीरेंद्र लाक्रा आणि त्याची मैत्रीण मनजीत टेटे यांनी आनंद टोप्पोची हत्या केली आणि नंतर ही आत्महत्या असल्याचं म्हटलंय. या हत्या प्रकरणाच्या तपासात आंतरराष्ट्रीय खेळाडू बीरेंद्र लाक्रा हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे, असं  बंधन टोप्पोंनी तक्रारीत म्हटलंय. विशेष म्हणजे, आनंदच्या मृत्यूच्या अवघ्या दहा दिवस आधी त्यांचे लग्न झालं होतं.


बंधन टोप्पो काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना बंध टोप्पो म्हणाले की, "बिरेंद्र लाक्रा आणि त्याची मैत्रीण मनजीत टेटे आणि आनंद हे तिघेही इन्फोसिटी पोलिस स्टेशन अंतर्गत आयुष रेडियस नावाच्या फ्लॅटमध्ये राहत होते. यादरम्यान बिरेंद्र आणि आनंद यांच्यात मनजीतबाबत वाद झाला. दरम्यान, 28 फेब्रुवारीला रागाच्या भरात बिरेंद्र आणि मनजीतनं आनंदची हत्या केली आणि हत्याकांड टाळण्यासाठी त्याला आत्महत्येचं नाव दिलं. बिरेंद्र लाक्रा आणि मनजित टेटे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे."


मृताच्या गळ्यावर जखमेच्या खुणा
"या वर्षी फेब्रुवारीमध्ये आनंद टोप्पोचं लग्न झाल्याचे सांगितलं. 26 फेब्रुवारीला तो चुना सिंह आणि सुनंद टिकरे या मित्रांसह भुवनेश्वरला परतला. त्यानंतर बिरेंद्र, मनजीत आणि आनंद आनंदानं एकत्र राहत होते. 28 फेब्रुवारीला बिरेंद्रनं मला फोन करून आनंदनं साडीला गळफास लावून आत्महत्या केल्याचं सांगितलं. आमच्या कुटुंबीयांनी आनंदचा मृतदेह पाहिला असता त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा असल्याचं दिसून आलं", असंही बंधन टोप्पोंनी म्हटलंय.



हे देखील वाचा-